नागपूर-हैदराबाद वंदेभारत एक्सप्रेस लवकरच...#Nagpur Hyderabad Vandebharat Express Soon - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



नागपूर-हैदराबाद वंदेभारत एक्सप्रेस लवकरच...#Nagpur Hyderabad Vandebharat Express Soon

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

महाराष्ट्र राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी लिहिलेल्या पत्राची दखल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतली असून, नागपूर- हैदराबाद दरम्यान वंदेभारत एक्स्प्रेस चालविण्यासाठीची तयारी आरंभली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयामुळे नागपूर, विदर्भातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. शिवाय केलेल्या "प्रयत्नाच्या परिपूर्तीचा आनंद आणि यशाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा" असे दुहेरी अनुभव सुधीर मुनगंटीवार यांच्या संदर्भात अधोरेखित होणार आहे.#khabarkatta chandrapur

नागपूर-हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात यावी, अशी मागणी मुनगंटीवार यांनी गेल्या वर्षी रेल्वे मंत्र्यांकडे केली होती. मुनगंटीवार यांच्या या मागणीची दखल घेऊन रेल्वे मंत्रालयाने त्यावर सकारात्मक कार्यवाही केली आहे. नागपूर- हैद्राबाद वंदे भारत, ही ट्रेन लवकरच सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपूर लगतचे क्षेत्र आणि हैद्राबाद दरम्यानचा मार्ग, हा व्यापारी वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय व्यस्त मानला जातो. त्यामुळे नागपूर-हैद्राबाद मार्गावर बऱ्याच प्रवासी रेल्वेगाड्या देखील आहे. सध्या नागपूर- हैद्राबाद मार्गावर 25 रेल्वेगाड्या धावत असल्या तरी, या मार्गावर राजधानी आणि शताब्दीसारख्या सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचे मात्र तितके प्रमाण नाही. नागपूर आणि हैद्राबाद अंतर 581 किलो मीटरचे असून यासाठी सध्याच्या गाड्या सरासरी 10 तासांचा अवधी घेतात.

मात्र, आता मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने सुरू होत असलेल्या नव्या नागपूर-हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमुळे प्रवासाचा हा कालावधी 10 वरून 6 तास 30 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या विदर्भातील जिल्ह्यांना नागपूर- हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची प्रतीक्षा होतीच. ही ट्रेन सुरू होत असल्याने त्याचा लाभ मोठ्याप्रमाणात या चारही जिल्ह्यांतील व्यापारी वर्गाला होणार आहे. या रेल्वेगाडीचे थांबे कसे व किती राहणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन नागपूर आणि हैद्राबाद दरम्यानच्या बल्लारशा, सिरपूर, कागजनगर, रामगुंडम आणि काझीपेठ, या स्थानकांवर थांबणार असल्याचे कळते. ही गाडी सकाळी 6 वाजता नागपुरातून सुटणार असून दुपारी साडेबारा वाजता हैद्राबादला पोहोचणार आहे.#khabarkatta chandrapur

हैद्राबाद स्थानकावर एक तास थांबल्यावर तीच गाडी दुपारी दीड वाजता हैद्राबाद येथून निघून रात्री 8 वाजता नागपुरात परतणार आहे. ट्रेन Train ची कमाल वेग मर्यादा ताशी 130 किलो मीटर, एवढी राहणार आहे. या ट्रेनचे तिकीट दर अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र, सूत्रांच्या मते एसी चेअर कार वर्गासाठी 1515 रूपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी 2835 रूपये आकारले जाण्याची शक्यता आहे.#khabarkatta chandrapur


Pages