सुंदर चेहऱ्याला हवी गुणांच्या सौंदर्याची जोड -ना. सुधीर मुनगंटीवार :डिएसव्ही मिसेस इंडिया महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धेचे चंद्रपूर दिमाखदार आयोजन #dsv_mrs_majarashtra - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



सुंदर चेहऱ्याला हवी गुणांच्या सौंदर्याची जोड -ना. सुधीर मुनगंटीवार :डिएसव्ही मिसेस इंडिया महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धेचे चंद्रपूर दिमाखदार आयोजन #dsv_mrs_majarashtra

Share This
जगातील कुठल्याही सौंदर्य स्पर्धेत सुंदर चेहऱ्यामागचे गुण तपासले जातात. दिसायला सुंदर आहे, पण अगदी एका प्रश्नाचे उत्तर आले नाही तरीही स्पर्धेतून बाद केले जाते. त्यामुळे सुंदर चेहऱ्याला कायम गुणांच्या आणि मनाच्या सौंदर्याची जोड आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
खबरकट्टा / चंद्रपूर :22मे 2023

प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित ‘डिएसव्ही मिसेस इंडिया महाराष्ट्र - 2023’ मी सौन्दर्यवाती महाराष्ट्राची या सौंदर्य स्पर्धेला त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. माजी मिसेस इंडिया इंटरनॅशनल ची श्रीलंकन पेजेंट 2019-20 च्या विजेता सौ.अनुरिता ढोलकिया आणि सोहेल खान तसेच ताई फाउंडेशनच्या अध्यक्ष गोमती पाचभाई यांचे ही स्पर्धा चंद्रपुरात घडवून आणल्याबद्दल मंत्र्यांनी विशेष कौतुक व अभिनंदन केले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुरज सादमवार , पवन सादमवार उपस्थिती होते. ना. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर शहरात या स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.


‘चंद्रपूर हा सर्वाधिक वाघ असलेला जगातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे. जगभरातील पर्यटकांना आपल्या जिल्ह्याचे आकर्षण आहे. चंद्रपूरने व्याघ्र पर्यटनासह इतरही क्षेत्रांमध्ये नावलौकीक कमवावा. जेणेकरून हा जिल्हा सदैव प्रगतीच्या शिखरावर असेल,’ असे मत व्यक्त करून चांगल्या उपक्रमांच्या सदैव पाठिशी असल्याचा विश्वासही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.
प्रत्येक क्षेत्रात चंद्रपूरने आपले वैशिष्ट्य व श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. ‘डिएसव्ही मिसेस इंडिया महाराष्ट्र’ सौंदर्य स्पर्धेच्या माध्यमातून देखील चंद्रपूरचे श्रेष्ठत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मिसेस इंडिया सुपर मॉडेल डॉ. झवेरीया, डिएसव्ही मिसेस ग्रँड इंडिया वैशाली मानमोडे, मिसेस इंडिया 2017 आसमा उपरे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

अश्लेषा विजेती, प्रियंका द्वितीय

अश्लेषा हिने डिएसव्ही मिसेस इंडिया 2023चा खिताब पटकावला, तर प्रियंका उपविजेती ठरली. ‘देवो के देव महादेव’ मालिकेत पार्वतीची भूमिका साकारणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सुहास धामी यांनी विजेत्यांना क्राऊन प्रदान केला. आतिषा हिने तृतीय आणि आकांक्षाने चौथे स्थान पटकावले. यासोबतच संगिता कुकडे यांना स्पेशल इंटरेस्टेड क्राउन प्रदान करण्यात आला. डिएसव्ही मिसेस इंडिया महाराष्ट्र वुमन ऑफ डिग्निटी नीना नगराळे , वुमन ऑफ सबस्टन्स स्वप्ना राऊत यांना देखील गौरविण्यात आले.

Pages