नरभक्षक मादी बिबट व तिचे दोन बछडे जेरबंद...#Cannibal female leopard and her two cubs in jail - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



नरभक्षक मादी बिबट व तिचे दोन बछडे जेरबंद...#Cannibal female leopard and her two cubs in jail

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या व्याहाड खुर्द उपवनपरिक्षेत्रातील सामदा बूज बीटमध्ये येणाऱ्या वाघोली बुटी शिवारात शनिवारी बिबट्याने हल्ला करून एका महिलेला ठार केल्याची घटना घडली होती.
वनविभागाने त्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वैनगंगा नदीकाठावरील डॉ. रूठे यांच्या फार्म हाऊस जवळ शंभर मीटर अंतरावर पिंजरे लावून ठेवले असता, रात्रीच्या सुमारास हल्लेखोर मादी बिबट व तिचे दोन बछडे जेरबंद झाले.#khabarkatta chandrapur 

वाघोली बुटी परिसरात वाघ व बिबट्याने महिनाभरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. 20 दिवसांपूर्वी याच परिसरात वाघाने ममता बोदलकर या महिलेला ठार केले होते तर शनिवारी वाघोली बुटी येथील प्रेमिला रोहणकर ला शनिवारी शेतात काम करण्यासाठी गेल्या असताना याच मादी बिबट्याने तिच्यावर हल्ला करून ठार केले. या घटनेनंतर शेतात काम करणारे 50 ते 60 जण धावत आले. त्यांनी बिबट्याला पळविण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने बिबट्याने धूम ठोकली.
सदर घटनेनंतर माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी वाघोली बुटी येथे जाऊन रोहणकर कुटुंबियांची भेट घेत बिबट्याला पकडण्याची सूचना वन अधिकाऱ्यांना दिली होती.#khabarkatta chandrapur 

शनिवारी रात्रीच वन विभागाने त्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वैनगंगा नदीकाठावरील डॉ. रूठे यांच्या फार्महाऊसजवळ शंभर मीटर अंतरावर पिंजरे लावून ठेवले होते. रात्रीच्या सुमारास हल्लेखोर मादी बिबट व तिचे दोन बछडे पिंजऱ्यात जेरबंद झाले.


Pages