कलावंत म्हणजे काय ? कलावंताची नेमकी व्याख्या काय असे अनेक प्रश्न नेहमी विचारले जातात ....अमुक एका व्यक्तीने दोन तीन नाटकात कामे केली म्हणजे त्याला कलावंत म्हणायचं का असेही विचारतात काही लोक ....पण माझ्या मते काही मंडळी कलेवर मनापासून प्रेम करतात ..भूमिका 5 मिनिटांची असली तरी त्या व्यक्तीच्या लेखी ते महत्त्वाचे नसून कलेवरचे प्रेम महत्वाचे असते......अशीच एक कलावती म्हणजे अश्विनी खोब्रागडे
अश्विनी मुळात राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ती , पण नाट्य चित्रपट क्षेत्राकडे तिला पूर्वीपासूनच ओढा . अनेक सेलिब्रिटीज सोबत तिचे निकटचे संबंध आहेत. त्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटीज ने चंद्रपुरात हजेरी लावली आहे. शर्वरी लोहकरे , शशांक व्यास , सारा श्रवण , अक्षया भिंगार्डे, रुपाली भोसले, नम्रता गायकवाड , आनंदा कारेकर अशी कितीतरी मोठी यादी आहे. मुंबईतील सेलिब्रिटी आणि चंद्रपूर यांच्यात नाते निर्माण करत अश्विनीने हे स्नेहबंध अधिक दृढ केले आहे.
2013 मध्ये आम्ही चिंधी बाजार हे नाटक करायला घेतले. मणी डोरले विकणारी महिला या नाटकात अश्विनी ने साकारली , दुसऱ्या अंकात ती गर्भश्रीमंत महिला म्हणून यायची . या दोन्ही एंट्रीज ला अश्विनी हमखास टाळ्या घेऊन जायची. भूमिका छोट्या असल्या तरी तिचा उत्साह व भूमिकेशी समरस होण्याची वृत्ती मला विशेष आवडते. त्यामूळे ती मला कलावंत म्हणून महत्वाची वाटते. या वर्षीच्या वृंदावन मध्ये सुद्धा एका भिकारी विधवेच्या छोट्या एंट्रीत ती भाव खाऊन जायची. प्रचंड गाजलेल्या पल्याड या चित्रपटात तिने भूमिका करत प्रेक्षकांना सुखद धक्का दिला . या चित्रपटात सगुण निर्गुण हे महत्त्वाचे गाणे तिच्यावर चित्रित करण्यात आले आहे. अतिशय मेहनती व प्रामाणिक कलावंत असा तिचा कौतुकोल्लेख दिग्दर्शक शैलेश दुपारे करतात.#khabarkatta chandrapur
अश्विनी म्हणजे सळसळता उत्साह , चैतन्य , फुल्ल ऑफ लाईफ असे व्यक्तिमत्त्व . लाघवी व प्रेमळ स्वभावाची अश्विनी पहिल्याच भेटीत कुणालाही आपलेसे करते. मैत्रीच्या दुनियेतील राणी असा मी तिचा उल्लेख करेन . त्याला तिच्या सर्व मित्र मैत्रिणीचे अनुमोदन राहील याची मला खात्री आहे. कलावंत म्हणून तिची कारकीर्द जरी छोटी असली तरी रंगकर्मी म्हणून नाटक उभारण्यासाठी बॅक स्टेज ला सुद्धा परिश्रम घेते. वृंदावन च्या निर्मिती प्रक्रियेत व प्रवासात याचा प्रत्यय मला आला. तिचा मोरल सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा होता.#khabarkatta chandrapur
अश्विनी काँग्रेस पक्षात मोठ्या व महत्वाच्या पदावर आहे. महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चात ती प्रदेश अध्यक्ष आहे. राजाभाऊ खोब्रागडे , गिरीशजी खोब्रागडे यांच्या कुटुंबातील सदस्या असलेल्या अश्विनीने आपले पाय कायम जमिनीवर ठेवले आहे हे महत्वाचे. लोक काय म्हणतील अशा आशयाच्या वाक्याना मुळीच महत्व न देताना सातत्याने काम करण्यावर ती भर देते. स्पष्टवक्तेपणा व परखड स्वभाव हे तिच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य .मर्दानी महिला मंच च्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी तिने विविध आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला आहे.#khabarkatta chandrapur
नाटकाची चमू प्रयोगासाठी बसने जाताना धमाल मस्ती करणारी अश्विनी शहरात होणाऱ्या प्रत्येक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. ती चंद्रपूरात नसली तरी जिथे असेल तिथून ती जिथे असेल तिथून त्या उपक्रमात आपला सहभाग नोंदवते .नुकतेच सुशील सहारे याने नाट्य प्रशिक्षण शिबिर आयोजित केले , त्या उपक्रमाला तिने तिच्या बिल्डिंग मधील हॉल निःशुल्क उपलब्ध करून देत सहकार्य केले. प्रत्यक्ष मंचावर मोठया भूमिका करून पारितोषिके पटकविणा-या कलावंत मंडळी इतकीच अश्विनी सारखा सहकार्याची भावना जोपासणारी कलावती मला महत्वाची वाटते. तिच्या राजकीय , सामाजिक , सांस्कृतिक प्रवासात तिचे पती निखिलेश यांचे सहकार्य व साथ फार महत्वाची आहे. मुली शलाका व अनिषा देखील अतिशय गुणी आहेत . शलाका विदेशात शिक्षण घेऊन नोकरीला आहे तर अनिषा बंगलोर ला शिक्षण घेत आहे. त्यांच्या शिक्षणाकडे देखील अश्विनी कायम लक्ष ठेवून असते. एक आणखी महत्वाची बाब म्हणजे तिचे पशूप्रेम .मूक जीवांची काळजी , संरक्षण याकडे ती विशेष लक्ष देते व त्या संबंधीच्या चळवळीत देखील ती सक्रिय झाली आहे.चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी ती अग्रेसर असते.#khabarkatta chandrapur


