पोलिस शिपायाचा अपघाती मृत्यू...#Accidental death of police constable - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



पोलिस शिपायाचा अपघाती मृत्यू...#Accidental death of police constable

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

डाक देऊन परत जातांना एका पोलिस शिपायाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना काल घडली. विशाल गणपत खडके (42) रा. चंद्रपूर असे मृतक पोलिस शिपायाचे नाव आहे. ते पोंभूर्णा पोलिस स्टेशन येथे कर्तव्यावर होते.

पोलिस स्टेशन पोंभूर्णा येथील पोलिस शिपाई डाक घेऊन मूल येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात गेला होता. डाक देऊन दुचाकीने परत जात असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना काल शुक्रवारी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान चिरोली गावानजीकच्या पुलासमोरील वळणावर घडली. यात गंभीर दुखापत होऊन शिपाई चा मृत्यू झाला.#khabarkatta chandrapur

Pages