खबरकट्टा/चंद्रपूर:
वरोरा शहरातील फुकट नगर येथे लाकडी दांड्याच्या सहाय्याने एका तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. रीतेश लोहकरे असे मृत तरुणाचे नाव आहे.#khabarkatta chandrapur
रितेशचा मृतदेह हा त्याच्या घरापासून अगदी 500 मीटर अंतरावर आढळला. मात्र ही घटना होत असताना कोणालाच कसे समजले नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अज्ञात व्यक्तींनी लाकडी दंड्याच्या साह्याने त्याच्या डोक्यावर वार करुन हत्या केल्याचे उघड झाले आहे या संदर्भात स्थानिक नागरिकांनी मृतदेह दिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमोल काचोरे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे.#khabarkatta chandrapur

