खबरकट्टा/चंद्रपूर:
राजुरा तालुक्यातील विरुर स्टे. येथे हिटरवर पाणी गरम करताना विजेचा शॉक लागून गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. राजुरा तालुक्यातील विरुर स्टे. येथे रविवारी सदर घटना घडली.#khabarkatta chandrapur
माहितीनुसार गोपाल महानंद हे विरुर रेल्वे स्टेशन येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सात ते आठ महिन्यांपूर्वी सोनी बाग सोबत विवाह झाला होता. लग्नानंतर गोपाल हा त्याच्या आई आणि बहिणीसोबत रेल्वे वसाहतीत राहतो. रविवारी सकाळी 8:00 वाजता सोनी घरातील कामे करत होत्या. यादरम्यान ती हिटरवर पाणी गरम करण्यासाठी गेली असता अचानक तिला विजेचा झटका बसला आणि ती बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.#khabarkatta chandrapur
प्रकृती गंभीर झाल्याने राजुरा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले, मात्र तेथे पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटस्फोटानंतर सोनीने गोपालशी लग्न केले. तिला 5 वर्षांची मुलगी आहे. ती गरोदर होती आणि क्राइस्ट इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होती. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. विरुर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.#khabarkatta chandrapur

