खबरकट्टा/चंद्रपूर:
महाराष्ट्रातील आणि एकंदरीत देशातील बेरोजगारांची संख्या पाहिली तर ती प्रचंड प्रमाणात असून या संख्येच्या तुलनेत नोकरीची उपलब्धता मात्र खूप नगण्य आहे. त्यामुळे नोकरीसाठी प्रचंड प्रमाणात स्पर्धा निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते.#khabarkatta chandrapur
बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की शिपाई पदासाठी देखील उच्चशिक्षित उमेदवारांनी अर्ज केलेले असतात. यावरून बेरोजगारीचे वास्तव समोर येते.त्यातच कोरोना महामारीमुळे गेल्या दोन ते अडीच वर्षापासून अनेक प्रकारची भरती प्रक्रिया थांबवण्यात आलेल्या होत्या.
परंतु आता हळूहळू विविध विभागातील भरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली असून त्यातच राज्यातील तब्बल अडीच लाख बेरोजगार उमेदवार चातकासारखी वाट पाहत असलेला शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे.या लेखांमध्ये आपण होऊ घातलेल्या या शिक्षक भरती विषयी अधिकची माहिती घेणार आहोत.
शिक्षक भरतीचा मुहूर्त ऑगस्ट महिन्यात
राज्यातील लाखो बेरोजगार उमेदवार वाट पाहत असलेल्या शिक्षक भरतीला अखेर ऑगस्ट महिन्याचा मुहूर्त मिळाला असून सध्या जे काही शिक्षक कार्यरत आहेत त्यांची संच मान्यता पंधरा मे पर्यंत पूर्ण करून त्यानंतर नव्या शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल कार्यरत करण्याचे नियोजन प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी शालेय शिक्षण विभागाला कळवल्याचे समोर आले आहे.#khabarkatta chandrapur
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली होती. या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी चा निकाल 24 मार्च रोजी जाहीर देखील करण्यात आला. मात्र दोन महिने उलटून देखील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल ऍक्टिव्ह नसल्यामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड प्रमाणात अस्वस्थता होती.#khabarkatta chandrapur
याच दरम्यान उमेदवारांनी उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल केल्यामुळे शासनाला शिक्षक भरतीचे नियोजन करणे आता भाग पडले आहे. सध्याचा विचार केला तर विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशननुसार शिक्षकांची 2022-23 ची संच मान्यता करण्याची प्रक्रिया आता सुरू असून ही प्रक्रिया जेव्हा पूर्ण होईल तेव्हा नेमके रिक्त पद किती आहेत हे स्पष्ट होईल. रिक्त पदांचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर नव्या शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
अशा पद्धतीचे असतील या शिक्षक भरतीचे टप्पे
1- सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांचे संचमान्यता 15 मे पर्यंत अंतिम करण्यात येईल.
2- त्यानंतर 20 मे पर्यंत शाळानिहाय अंतिम संच मान्यता वितरित होतील.
3- या संचमान्यतेतील जे काही मंजूर पदे आहेत त्यानुसार पदभरतीची कार्यवाही सुरू होईल.
4- व्यवस्थापनांच्या शिक्षक पदांची बिंदू नामावली 30 जून पर्यंत प्रमाणित करणे
5- संबंधित व्यवस्थापनाच्या रिक्त पदांची जाहिरात 15 जुलै पर्यंत पवित्र पोर्टलवर दिली जाईल
6- 20 ऑगस्ट पर्यंत उमेदवारांकडून पवित्र पोर्टल वर प्राधान्यक्रम भरणे आणि नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल.

