खबरकट्टा/चंद्रपूर :
शहरातील घुटकाळा वार्डात दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना रविवारी नांक 7 मे 2023 चे रात्रो 8 वाजताच्या दरम्यान घडली यात शहर पोलिसांनी 4 युवकांना अटक केली असून 3 युवक फरार आहेत.#khabarkatta chandrapur
घुटकाळा वार्डात दुचाकीवर बसल्याने दोन युवकात शाब्दिक वाद झाला या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
त्यानंतर दोन्ही युवकांनी आपल्या मित्रांची गॅंग बोलवून एकमेकांना मारण्याचा बेत आखला यामुळे घुटकाळा परिसरात दोन गटात जोरदार फ्री स्टाईल हाणामारी झाली.#khabarkatta chandrapur
घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत तन्वीर नसरुद्दीन काझी, सचिन नंदनवार, सूफीयान सादक अली व शाहरुख काजी या चार युवकांना अटक करण्यात आली असून 3 आरोपी फरार आहेत आरोपींवर 326, 294, 143, 144, 149, 506, 427 भांदवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

