ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी शहरातील तलाठी कार्यालया समोरील असलेली गट क्रमांक 605 शासकीय जागा असुन त्या जागेवरील 2000 स्के. फुट जागेवर नगरसेविका निलिमा सावरकर यांचे बंधू दिनेश प्रभाकर बोंबटकर यांनी अतिक्रमण करून टिनाचे शेड उभारले आहे.#khabarkatta chandrapur
हि जागा शासकीय मालकीची आहे. तर गट क्रमांक 605 मधील 0.06 हे. आर जागा उपलब्ध आहे. ती जागा तलाठी कार्यालय व तलाठ्याचे शासकीय निवासस्थान करिता राखीव ठेवण्यात आल्याची माहिती आहे. तरीही अगदी तलाठी कार्यालया समोरच नगरपरिषद ब्रम्हपुरी च्या नगरसेविका निलिमा लक्ष्मण सावरकर यांच्या घरा शेजारीच त्यांचे सख्खे लहान भाऊ दिनेश प्रभाकर बोंबटकर यांनी अंदाजे 2000 स्के. फुट जागेवर अतिक्रमण केले आहे. #khabarkatta chandrapur
सदर शेड वर नगरसेविका निलिमा लक्ष्मण सावरकर यांच्या मुलांचे अक्षद बार अन्ड रेस्टॉरंट चा फलक लावण्यात आले आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांने किंवा त्यांच्या रक्त नात्यातील व्यक्ती ने शासकीय मालकीच्या जागेवर अतिक्रमण करणे हा गुन्हा ठरतो. यानुसार सदर सदस्यांचे सदस्यव रद्द करण्याची तरतूद स्थानिक स्वराज्य संस्था अधिनियमात आहे.
नगरसेविका निलिमा लक्ष्मण सावरकर यांचे निवासस्थान असलेल्या गाळ्यात अक्षद बार अन्ड रेस्टॉरंट नुकतेच सुरू केले आहे. यांनी भाऊ दिनेश प्रभाकर बोंबटकर यांनी शासकीय जागा अतिक्रमण करून शेड उभारले आहे.#khabarkatta chandrapur
जर एखाद्या स्वराज्य स्वराज्य संस्थेच्या सदस्यांनेच कुटुंबियांकडून जर शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्याचा वापर व्यवसाया करिता करणे हा अक्षम्य गुन्हा आहे. त्यामुळे ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या नगरसेविका निलिमा लक्ष्मण सावरकर यांचे सदस्यत्व तात्काळ रद्द करण्यात यावे . आणि दिनेश प्रभाकर बोंबटकर यांनी शासकीय जागेवरील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे. अन्यथा विदर्भ राज्य युवा आघाडी ब्रम्हपुरी च्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी नगरपरिषद ब्रम्हपुरी यांना देण्यात आले. व प्रतिलिपी म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना सुध्दा निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. यावेळी विदर्भ राज्य युवा आघाडी ब्रम्हपुरी चे तालुकाध्यक्ष योगेश नंदनवार, अमर गाडगे पत्रकार, उदय पगाडे, विठ्ठल टिकले, संदीप कामडी, निकेश तोंडरे, विश्वेश्वर विधाते, निखिल डांगे, मिंलीद राऊत, प्रशांत नंदनवार, नितेश राऊत, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

