डी एन आर ट्रॅव्हल्स मधून बॅग चोरी: तक्रारदाराची नुकसान भरपाईची मागणी - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



डी एन आर ट्रॅव्हल्स मधून बॅग चोरी: तक्रारदाराची नुकसान भरपाईची मागणी

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

चंद्रपूर येथे एका ट्रॅव्हल्स मधून बॅग चोरी झाली असून अंदाजे एक लाख रुपये चा सामान लंपास झाले आहे. सौ. पायल अशोक गांधी रा. शिरुर जिल्हा पुणे. ते पुणे येथून डी. एन. आर. ट्रॅव्हल्स ने रात्रो 10.30 वाजता पुणे ते चंद्रपूर प्रवासाची क्रमांक 7 व 8 तिकीटे बुक करून 30/4/2023 ला पुणे वरून दोन बॅग घेऊन प्रवास सुरू केला व चंद्रपूरला 1 मे 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता पोहोचल्या. सोबत तीन मुले सुद्धा होती. चंद्रपूर येथे पोहोचल्यानंतर टोकन क्रमांक 7 व 8 त्यांना देऊन त्या क्रमांकाची बॅग परत मागितली असता क्रमांक 7 ची बॅग परत दिली आणि 8 दिलीच नाही. क्रमांक 8 च्या बॅगमध्ये किमान एक लक्ष रुपयाचे साहित्य होते. ( स्वतः व अपत्यांचे कपडे, लग्नकार्यक्रमात द्यावयाचे कपडे) त्यांनी पुणे येथून चंद्रपूर येथे लग्नकार्यक्रमात (लग्नाचा स्वागत समारोह बल्लारपूर येथे होता.) समिलित होण्यासाठी प्रवास केला होता.

सौ. पायल अशोक गांधी यांनी चालक, वाहक आणि व्यवस्थापक यांना जेव्हा त्यांच्या कार्यालयात बसून बॅग मागितली. परंतु त्यांनी फार वेळ बसवून ठेवून त्यांच्या सोबत अपशब्द बोलले व 10,000 रुपये नगदी घेऊन परत जाहा असे म्हटले. नंतर सौ. पायल अशोक गांधी यांनी त्यांना म्हटले की, मी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करणार आहे. तेव्हा त्यांनी तुमच्या तर्फे जे होते ते करा. पोलीस काय करतात ते आम्ही बघून घेऊ? एका महिला प्रवासी सोबत तीन मुले घेऊन लांब प्रवास आणि डी. एन. आर. ट्रॅव्हल्स तर्फे दिनांक 2 मे 2023 रोजी ट्रॅव्हल्स मालक, चालक, वाहक आणि व्यवस्थापक ह्या चार व्यक्तींची तक्रार रामनगर पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे.#khabarkatta chandrapur

सौ. पायल अशोक गांधी यांनी तक्रारीमध्ये मागणी केली आहे की, त्यांचे कपडे व इतर साहित्य परत मिळवून द्यावे व डी. एन. आर. ट्रॅव्हलच्या संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी.तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशन च्या पोलीस निरीक्षक सौ. लता वाढवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक समलवार करीत आहे.#khabarkatta chandrapur

पिडीतेची नुकसान भरपाई 10,000 रुपये द्यायला तयार आहोत, परंतु त्यांच्या बॅग मध्ये अंदाजे 1,00,000 रुपये चे सामान होते.#khabarkatta chandrapur


Pages