खबरकट्टा/चंद्रपूर :
चुलीवरचा स्वयंपाक हा स्वादिष्ट असतो. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने स्वतः चुलीवरचा स्वयंपाक करतानाचे छायाचित्र समाज माध्यमावर सार्वत्रिक केले आहे. या छायाचित्रात सचिन, पत्नी अंजली व मुलगी सारा चुलीवर एकत्रित स्वयंपाक करीत आहेत. तसेच या आनंदाच्या प्रसंगी मुलगा अर्जुन याला ‘मिस’ करत असल्याचे म्हटले आहे.#khabarkatta chandrapur
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नुकताच आपला ५० वा वाढदिवस साजरा केला. सध्या सचिन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कोलारा गेट जवळील बांबू या पंचतारांकित रिसॉर्ट मध्ये पत्नी अंजली व काही मित्रांसोबत मुक्कामी आहे. शुक्रवारी सचिनने मुलगा अर्जुनची आठवण करीत ताडोबातून सोशल मीडियावर स्वतःचे इंस्टाग्राम व फेसबुक वर एका खेडेगावातील चुलीवर स्वयंपाक करतानाचे छायाचित्र आणि मेसेज सचिन तेंडुलकर यांनी शेअर केला आहे.क्रिकेटच्या मैदानात शतकावर शतके मारणाऱ्या सचिनने वयाचं अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याचे सेलिब्रेशन काही खास मित्रमंडळींसोबत एका सुंदर निसर्गरम्य रिसॉर्टवर सेलिब्रेट केले. जो फोटो पोस्ट करण्यात आलेला आहे,त्यामध्ये पत्नी अंजली, मुलगी सारा आणि सचिन तेंडुलकर दिसत आहे.#khabarkatta chandrapur
ग्रामीण भागातील एखाद्या गावातील स्वयंपाकाच्या चुलीसमोर बसून फुंकणीने चूल पेटविण्याचा प्रयत्न करीत आहे. मुलगी सारा सुनील चुलीमध्ये काट्या लावत आहे. तर पत्नी स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करीत आहे. मुलगा अर्जुन सध्या आयपीएल मध्ये व्यस्त असल्याने त्याची खूप आठवण येते आहे असे देखील त्यांनी पोस्ट मध्ये म्हटले आहे.#khabarkatta chandrapur
दरम्यान, हे छायाचित्र नेमके कोणत्या खेडेगावातील आहे याचा उल्लेख मात्र केलेला नाही. सचिनने गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस ताडोबात जंगल सफारी केली. या सफरीत सचिनला रविवारी छोटी तारा या वाघिणीचे तसेच दोन अस्वलांचे दर्शन आले. शुक्रवारी अलिझंझा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थांना गणवेश, पुस्तके व स्कूल बॅग चे वितरण केले. दरम्यान शनिवारी पुन्हा सफारी करणार असून रविवारी सचिन पत्नी अंजली व मित्रांसोबत मुंबईला परत जाणार आहे.

