बुद्ध पौर्णिमेनिमित्त भारतरत्न सचिन तेंडुलकर ताडोबात दाखल...#Bharat Ratna Sachin Tendulkar at Tadobat on the occasion of Buddha Purnima - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



बुद्ध पौर्णिमेनिमित्त भारतरत्न सचिन तेंडुलकर ताडोबात दाखल...#Bharat Ratna Sachin Tendulkar at Tadobat on the occasion of Buddha Purnima

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

भारतरत्न सचिन तेंडुलकर गुरुवारी नागपुरात पोहोचला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अंजली तेंडुलकरही उपस्थित होती. दरवर्षी तेंडुलकर आपल्या कुटुंबासह चंद्रपूर येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी येत असल्याची माहिती आहे. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर सचिन थेट ताडोबासाठी रवाना झाला.#khabarkatta chandrapur

क्रिकेटर सचिन तेंडुलकरला जंगल सफारीचं वेड आहे. त्यांना वेळ मिळेल तेव्हा ते व्याघ्र प्रकल्पात पोहोचतात. काही दिवसांपूर्वीच सचिनने उमरेड करंडला अभयारण्यात जंगल सफारीचा आनंद लुटला होता. गुरुवारी सचिन पुन्हा एकदा पत्नी अंजली तेंडुलकरसोबत जंगल सफारीसाठी पोहोचला. त्याच्यासोबत त्याचे काही जवळचे मित्रही होते. सचिन आणि त्याचे कुटुंबीय नागपूरहून रस्त्याने ताडोबासाठी निघाले.

सचिनच्या नागपूर विमानतळावर आगमनाची बातमी समजताच चाहत्यांची एकच गर्दी उसळली होती. विमानतळावर सुरक्षा दलाच्या जवानांनीही सचिनचे जोरदार स्वागत केले. बुद्ध पौर्णिमेनिमित्त वन्यप्राण्यांची गणना होणार आहे. जर सर्व काही ठीक झाले आणि हवामान स्वच्छ असेल तर सचिनला चांदण्या रात्रीही वन्य प्राणी दिसतील.#khabarkatta chandrapur

Pages