खबरकट्टा/ चंद्रपूर :
रेल्वे गाड्यामधील प्रवाश्यांचे महागडे मोबाईल, पर्स चोरी करणाऱ्या आरोपीला लोहमार्ग पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे, त्याच्या ताब्यातून 2 लाख 8 हजार 700 रुपये किमतीचे महागडे 5 मोबाइल जप्त करण्यात आले.
तुळशीराम दामोधर राठोड वय 31 वर्ष रा. टिचर कॉलनी, गडचांदूर, ता. कोरपना असे आरोपीचे नाव आहे.#khabar katta chandrapur
आरोपी तुळशीराम आधी एका ट्रान्सपोर्ट कंपनीत अकाऊंटंट चे काम करायचा, परंतु लॉटरी व सट्ट्याचा नाद लागल्याने पगार पुरत नव्हता त्यामुळे त्याने रेल्वेत प्रवाश्यांचे महागडे मोबाईल चोरणे सुरू केले यात त्याला पैश्यांची आवक वाढू लागल्याने त्याने नागपूर वरून सुटणाऱ्या एक्सप्रेस बल्लारशाह मार्गावरील रेल्वे गाड्यात चोरी करू लागला.#khabar katta chandrapur
रेल्वे प्रवासात प्रवाश्यांच्या मोबाईल चोरीच्या घटना वाढल्याच्या तक्रारी लोहमार्ग पोलिसांना प्राप्त झाल्याने लोहमार्ग पोलिस अधीक्षक वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांच्या सूचनेनुसार हवालदार महेंद्र मानकर, विनोद खोब्रागडे, नितीन शेंडे, अविन गजबे, गिरीश राऊत, मंगेश तितरमारे, बल्लारशाह येथील शिपाई संदेश लोणारे, संदीप लहासे, अभिषेक ठाकरे यांनी सापळा रचून आरोपी तुळशीरामला अटक केली. त्याच्या ताब्यातून 2 लाख 8 हजार 700 रुपयांचे पाच महागडे मोबाइल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.#khabar katta chandrapur

