‘या’ रेल्वे ब्रिज ला ‘ब्लॅक स्पॉट’ घोषीत करा...#Declare 'this' railway bridge as a 'black spot' - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



‘या’ रेल्वे ब्रिज ला ‘ब्लॅक स्पॉट’ घोषीत करा...#Declare 'this' railway bridge as a 'black spot'

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर :

शहरातील बल्लारशा मार्गे शहरात येणाऱ्या मुख्य मार्गावरील बाबूपेठ मधील लालपेठ येथील रेल्वे उड्डाणपूल हा सध्या अपघाताचा स्पॉट बनलेला आहे. या ठिकाणी मागील काही महिन्यात अनेक अपघात झालेले असून यात अनेकांनी आपले प्राण गमावले तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व पत्करावे लागले आहे.#khabarkatta chandrapur 

या ब्रिज वरती वळण घेते वेळी दोन्ही बाजूने लोखंडी पाईपची रेलिंग बनवलेली आहे. चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने लोखंडी पाईप ची रेलिंग तुटून खाली कोसळल्याचे अनेक घटना घडत आहे.#khabarkatta chandrapur 

या वळणावरती काँक्रेटची भिंत उभारण्याची मागणी येथिल जनतेने आप चे राजु कुडे यांचा कडे केली आहे. तसेच वरोरा नाका येथे ट्रॅफिक सिग्नल नसल्यानें अनेक वाहनांचे अपघात होत असून भविष्यात होणारी मोठी दुर्घटना टाळण्यासाठी येथे ट्रॅफिक सिग्नल देण्याबाबत आपचे सुनिल सदभय्या यांनी शहर कमिटी कडे सुचविले आज या दोन्हीं विषय संदर्भात आप चे शहर अध्यक्ष योगेश गोखरे यांच्या नेतृत्त्वात निवेदने देण्यात आली.

या दोन्ही मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांनी दिले.#khabarkatta chandrapur 

यावेळेला आपचे जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे, जिल्हा संघटन मंत्री भिवराज सोनी, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे,शहराध्यक्ष योगेश गोखरे, महिला अध्यक्षा ॲड. श्रीमती सुनिता पाटील, शहर सचिव राजु कुडे, युवा शहराध्यक्ष संतोष बोपचे, शहर उपाध्यक्ष रहमान खान पठाण, संघटनमंत्री सिकंदर भाऊ सागोरे, सुनील सदभैयाजी, कोषाध्यक्ष स्वप्नील घोगरे, सुमित पाटील तथा इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.#khabar katta chandrapur 

Pages