अभिनंदन: जेष्ठ पत्रकार प्रशांत विघ्नेश्वर यांची झेडआरयूसीसी-सेंट्रल रेल्वे सदस्य पदी नियुक्ती - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



अभिनंदन: जेष्ठ पत्रकार प्रशांत विघ्नेश्वर यांची झेडआरयूसीसी-सेंट्रल रेल्वे सदस्य पदी नियुक्ती

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
चंद्रपूर जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रात आपल्या अभ्यासपूर्ण लेखणीने अनेकांना न्याय मिळवून देण्यात अग्रेसर असणारे दैनिक नवराष्ट्रचे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत विघ्नेश्वर हे जिल्हा रेल्वेयात्री असोसिएशन, बल्लारशाह (बल्लारपूर)चे सचिव होते, त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची आता मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल उपयोगकर्ता परामर्शदात्री समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीचे पत्रकारीता क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतं असून त्यांच्या इष्टमित्रांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.#khabarkatta chandrapur

राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या शिफारशीची दखल घेत. मध्य रेल्वेचे उपमहाप्रबंधक पीयूष कांत चतुर्वेदी यांनी ,प्रशांत विघ्नेश्वर यांच्या समिती सदस्यपदी नियुक्तीचे आदेश काढले आहेत.#khabarkatta chandrapur

जानेवारी 2025 पर्यंत विघ्नेश्वर हे समितीवर सदस्य म्हणून काम करणार आहेत. विघ्नेश्वर हे चंद्रपूर येथे दै.नवराष्ट्र या वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.यापूर्वी प्रशांत विघ्नेश्वर यांच्याकडे तरुण भारत वर्धा जिल्हा प्रतिनिधी – सन 2008 – 2010, दै. लोकशाही वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी 2010 – 2018, दै. देशोन्नती ब्रँच मॅनेजर चंद्रपूर जिल्हा 2018 – 2019, भाजपा चंद्रपूर जिल्हा महानगर प्रसिद्धी प्रमुख 2015 ते 2020 जबाबदारी होती.#khabarkatta chandrapur

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर (2014) हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. त्यांचा पत्रकारिता व सामाजिक कार्याचा अनुभव मोठा आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांच्या मित्र परिवारांनी आनंद व्यक्त केला आहे.

Pages