शासनमान्य ‘स्वस्त वाळूचे दुकान’ उघडणार: निविदांवर सर्वांचे लक्ष...#Govt-sanctioned 'cheap sand shop' to open: all eyes on tenders - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



शासनमान्य ‘स्वस्त वाळूचे दुकान’ उघडणार: निविदांवर सर्वांचे लक्ष...#Govt-sanctioned 'cheap sand shop' to open: all eyes on tenders

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

वर्धा : सर्वात जास्त काळाबाजार चालणाऱ्या वाळूच्या व्यवहारास शिस्त लावणारे धोरण शासनाने मंजूर केले आहे. त्यानुसार शासनमान्य गोदामातून आता वाळू पुरविल्या जाणार आहे. पूर्वी लिलाव व्हायचे तेव्हा सर्वाधिक बोली लावणाऱ्यास शासन वाळू विकायचे. आता मात्र नेमके उलट झाले असून सर्वात कमी बोली लवणाऱ्यास वाळू मिळेल. आज त्यासाठी निविदा काढण्यात येणार असून बारा मेपर्यंत मुदत आहे.#khabarkatta chandrapur


एक मे पासून या धोरणाचा अंमल होणार होता. पण राज्यात कुठेही तसे झालेले नाही. सहाशे रुपये ब्रास या दराने वाळू विकल्या जाणार आहे. सध्या काळ्या बाजारात हा दर सात ते आठ हजार रुपये एवढा आहे. या भावाने वाळू विकत घेत बांधकाम शक्य नसल्याने सामान्यांनी घराचे काम थांबविले आहे. शासन स्वस्त वाळू देणार म्हणून हे चातकासारखी वाट बघत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक वाळू उपसा हिंगणघाट तालुक्यात होतो. म्हणून इथे काळाबाजारही मोठ्या प्रमाणात चालतो.

जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड म्हणाले की, निविदा प्रक्रिया प्रत्येक जिल्हानिहाय वेगळी आहे. निविदा प्रक्रिया आटोपल्यानंतर पुढील कार्यवाही होणार. बत्तीस वाळू घाट लिलाव पात्र असून त्यासाठी नऊ गोदाम तयार ठेवण्यात आले आहे. ऑनलाइन प्रक्रियेतून वाळू उपलब्ध करून दिली जाईल.#khabarkatta chandrapur

Pages