गडचांदूर बसस्थानकासाठी भीक मांगो आंदोलन...#Bhik Mango Movement for Gadchandur Bus Stand - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



गडचांदूर बसस्थानकासाठी भीक मांगो आंदोलन...#Bhik Mango Movement for Gadchandur Bus Stand

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर: :

औद्योगिक शहर असलेल्या व चार सिमेंटच्या कंपनी सभोवताली असणाऱ्या गडचांदूर शहराला आजपर्यंत साधे बसस्थानक नाही, नगर परिषद गडचांदूर येथे मागणी केली असता आमचेकडे जागा नाही आणि निधी नाही म्हणून वंचित बहूजन आघाडी जिल्हा चंद्रपूरच्या वतीने राज्यसरकारचा निषेध नोंदवत भव्य भीक मांगो आंदोलन करण्यात आले.गडचांदूर शहर मूख्य बाजार चौक ते राजूरा कोरपना मुख्य मार्गावरून भीक मागत संविधान चौकात आंदोलनाचा समारोप करण्यात आला.
वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे व महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता गौरकार यांनी सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात.
‘बस स्टँड आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘गडचांदूर ला बस स्टँड झालेच पाहिजे’, ‘भीक द्या भीक द्या कंगाल सरकारला भीक द्या’ अश्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले यादरम्यान गडचांदूर शहरातील प्रत्येक दुकांदाराकडून प्रतिकात्मक भीक मागत बस स्थानकाचे महत्व सांगण्यात आले.#khabarkatta chandrapur 

भीक मांगो आंदोलन वंचित चे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या नेतृत्वात महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कविता गौरकार, जेष्ठ नेते रामदास चौधरी, जिल्हा महासचिव अलकाताई मोटघरे, तालूका संघटक अमोल निरंजने, जिवती तालूका अध्यक्ष बालाजी सोनकांबळे, जेष्ठ सल्लागार ललिता गेडाम, धीरज तेलंग जिल्हाध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन, मायाताई दुर्गे, बेबीताई वाघमारे. आशाताई सोनडवले, सरोजताई दुबे, वैशालीताई दूधगवळी, जयाताई खैरे, सुजाता वाघमारे, रत्नमाला ताई वाघमारे आदी असंख्य महिला पुरुष कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.#khabarkatta chandrapur 

Pages