दुचाकीला बसची जोरदार धडक: दोन्ही दुचाकीस्वार जागीच गतप्राण...#Bike hit by bus: Both bikers died on the spot - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



दुचाकीला बसची जोरदार धडक: दोन्ही दुचाकीस्वार जागीच गतप्राण...#Bike hit by bus: Both bikers died on the spot

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
महाराष्ट्र तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्गावर राजुरा तालुक्यातील पांढरपौनी नाजिक भिषण अपघात झाला असुन ह्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील सायंकाळी 6:00 वाजताच्या दरम्यान पांढरपौनी जवळील नाल्या शेजारी असलेल्या एन एन ग्लोबल कोल वाशरी येथिल कामगार संदिप सिंह वय 31 वर्ष व दुसरा एक कामगार आपल्या दुचाकीने पांढरपौनी येथे परत येत असताना राजुरा येथुन पालगाव येथे जाणारी चंद्रपूर पालगाव बस क्र MH 07C 9538 ह्या बसने जोरदार धडक दिल्याने दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार हे राजुरा कडून बस येत असतानाच दुचाकीस्वार अचानक पांढरपौनी गावाच्या मार्गावर वळले. समोर अचानक दुचाकी आल्याने बस चालकाने ब्रेक मारला व बस बाजुला घेण्याचा प्रयत्न केला. ह्या प्रयत्नात बस रस्ता सोडुन नालीत अडकली मात्र दरम्यान बसची दुचाकीला धडक लागल्याने दोन्ही दुचाकीस्वार जागीच गतप्राण झाले. मात्र सुदैवाने बस मधील प्रवाशी सुरक्षित असुन बसमधील कुणाचीही प्राणहानी झाली नाही. घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असुन राजुरा पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे.

Pages