खबरकट्टा/चंद्रपूर:
चंद्रपूर : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या घोषणेनंतर पक्षात खळबळ उडाली आहे. पवारांनी पद सोडल्यापासून राष्ट्रवादीत राजीनाम्याचा टप्पा सुरू झाला आहे. बडे पवार यांच्या समर्थनार्थ चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्यासह कार्यकारिणीने पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.#khabarkatta chandrapur
मंगळवारी मुंबईत त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. त्यांची घोषणा होताच राज्यभरातील राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पवारांच्या समर्थनार्थ पक्षातील अनेक नेत्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली. त्याच अनुषंगाने चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीनेही राजीनामे जाहीर करत हायकमांडकडे पाठवले आहेत.#khabarkatta chandrapur
राजीनामा देणाऱ्यांमध्ये चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष बेबी उईके, विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी व अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यादरम्यान वैद यांनी आपले निवेदन जारी केले की, “आम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षात काम करू. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आहे की, शरद पवार राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहणार नसतील तर आम्हीही आमच्या पदावर राहणार नाही.

