आयुक्तांनी केली वडगाव झोन अमृत योजनेची पाहणी...#Commissioner inspected Vadgaon Zone Amrit Yojana - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



आयुक्तांनी केली वडगाव झोन अमृत योजनेची पाहणी...#Commissioner inspected Vadgaon Zone Amrit Yojana

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत केंद्र शासन पुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अॅण्ड अर्बन ट्रान्सफॉरमेशन (अमृत) पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे वडगाव झोन हवेली गार्डन परिसरातील काम पूर्ण झाले असुन सदर कामाची आयुक्त विपीन पालीवाल यांनी पाहणी केली व पाणी पुरवठ्यासंबंधी सर्व तक्रारी सोडवून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले.#khabarkatta chandrapur 

पाणी पुरवठा झोन क्र. 15 अंतर्गत हवेली गार्डन येथे अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झालेले आहे. 17 मे रोजी आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपअभियंता विजय बोरीकर, प्रभागाचे माजी नगरसेवक देवानंद वाढई, पप्पू देशमुख यांनी त्रिमूर्तीनगर, गणपती मंदिरा जवळील परिसर, लक्ष्मी सलुजा जवळील परिसर, मुस्तफा कॉलनी, स्नेह नगर, हरदेव किराणा चौक इत्यादी परिसरात भेट देऊन योजनेची पाहणी केली तसेच काही घरांना भेट देऊन पाणी पुरवठ्यासंबंधी समस्या जाणून घेतल्या.#khabarkatta chandrapur 


या परिसरातील अमृत योजनेअंतर्गत नळ जोडणीची कामे पूर्ण झाली आहे. अनेक जागी मीटर लावण्याचे काम पूर्ण झाले असुन काही जागी शिल्लक आहे. तसेच काही किरकोळ गळती दुरुस्ती करण्याचेही काम सुरु आहे. या त्रुट्या दुरुस्त करून लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश आयुक्त यांनी दिले आहेत.


Pages