सीएमपीडीआयच्या सौर ऊर्जा पॅनल मुळे शाळेचे इमारतीत आग: शाळेतील वीज उपकरणे व इतर साहित्य जळून खाक...#CMPDI's solar power panel causes fire in school building: Electrical equipment and other materials in school burnt - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



सीएमपीडीआयच्या सौर ऊर्जा पॅनल मुळे शाळेचे इमारतीत आग: शाळेतील वीज उपकरणे व इतर साहित्य जळून खाक...#CMPDI's solar power panel causes fire in school building: Electrical equipment and other materials in school burnt

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

दोन लाख रुपयांचे नुकसान : वरिष्ठांकडे तक्रार

तालुक्यातील पानवडाळा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये बसविण्यात आलेल्या सीएमपीडीआयच्या सौर ऊर्जा पॅनलमुळे शाळेच्या इमारतीस आग लागून शाळेतील संपूर्ण वीज उपकरणासह इतर महत्वपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याची घटना काल सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. सीएमपीडीआय वरोरा द्वारा काल दिनांक 17 मे ला तालुक्यातील पानवडाळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सौर ऊर्जा पॅनल बसविले होते. त्यामुळे अचानक बिघाड होऊन शाळेच्या इमारतीस सकाळी 9 वाजता आग लागली. ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असून शाळेतील संपूर्ण विद्युत उपकरणासह इतर साहित्य जळून खाक होऊन दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.#khabarkatta chandrapur

या घटनेची तक्रार शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासह ग्राम पंचायत पानवडाळाचे सरपंच प्रदीप महाकुलकर यांनी तहसीलदार भद्रावती, संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती भद्रावती, यांचे सह पोलिसात केली. या घटनेची चौकशी करून नुकसान भरपाईची मागणी ग्रामपंचायत सरपंच पानवडाळाचे महाकुलकर यांनी वरिष्ठांकडे केली आहे.#khabarkatta chandrapur

Pages