खबरकट्टा/चंद्रपूर:
राज्यातील दहावीची बोर्ड परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.#khabarkatta chandrapur
पहा कसे असेल वेळापत्रक
प्रवेश अर्ज (भाग एक) 25 मे सकाळी 11 वाजल्यापासून ते दहावी बोर्ड परीक्षाचा निकाल जाहीर होईपर्यंत.
प्रवेश अर्ज (भाग दोन) दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्जाचा भाग दोन भरता येणार.#khabarkatta chandrapur
प्रवेश प्रक्रिया (पहिली फेरी) - निकाल जाहीर झाल्यानंतर 10 ते 15 दिवसात पहिली प्रवेश फेरी पूर्ण करून विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया केली जाणार. यानंतरच्या प्रवेश फेऱ्यांबाबत परीक्षा बोर्ड लवकरच माहिती जाहीर करेल. दरम्यान याविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू.#khabarkatta chandrapur

