बागला चौक येथील दुकानावर प्लास्टीक बंदी उल्लंघन कारवाई: 5 हजार रुपये दंड...#Plastic ban violation action on shop in Bagla Chowk: Rs 5 thousand fine - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



बागला चौक येथील दुकानावर प्लास्टीक बंदी उल्लंघन कारवाई: 5 हजार रुपये दंड...#Plastic ban violation action on shop in Bagla Chowk: Rs 5 thousand fine

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

बागला चौक येथील हरीश मानकानी यांच्या मालकीच्या चांदणी कारवाई करून 5 हजार रुपये दंड वसुल केला आहे.

फुड्स या दुकानावर चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने चंद्रपूर महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली असुन व्यावसायिकास सक्त ताकीद देण्यात आली आहे. पुन्हा सदर गुन्हा केल्यास मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. मनपा हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास सातत्याने कारवाई केली जात असुन प्लास्टीक पिशव्यांच्या साठयाबाबत गुप्त माहीती देणाऱ्यास 5 हजारांचे बक्षिस सुद्धा जाहीर करण्यात आले आहे. यास मोठा प्रतिसाद मिळुन मनपापर्यंत प्लास्टीक साठ्याची गुप्त माहीती पोहचत आहे.#khabarkatta chandrapur 

एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर 5 हजार रुपयांपर्यंत दंड, दुसऱ्यांदा वापर केल्यास 10 हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर 25 हजार रुपये दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.#khabarkatta chandrapur 

सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त अशोक गरा यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात अतिक्रमण निर्मूलन अधिकारी संतोष गर्गेलवार, कर्मचारी अनिल खोटे, भरत बिरिया, बंडू चहरे विक्रम खोटे, सय्यद मोईनुद्दीन, डोमा विजयकर, अमरदीप साखरकर यांनी केली.


Pages