केंद्रीय राखीव पोलीस दलातर्फे वैभाव वाघमारे यांना अखेरची मानवंदना...#Last tribute to Vaibhav Waghmare by Central Reserve Police Force - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



केंद्रीय राखीव पोलीस दलातर्फे वैभाव वाघमारे यांना अखेरची मानवंदना...#Last tribute to Vaibhav Waghmare by Central Reserve Police Force

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या चिमूर तालुक्यातील पांढरवाणी येथील वैभव दशरथ वाघमारे वय - 30 वर्ष यांचा 15 मे ला ह्रदयवीकाराच्या धक्याने म्रुत्यु झाला .पांढरवाणी येथे 16 मे ला दुपारी 3.30 वाजता वैभव वाघमारे सी.आर .पी.एफ.जवान यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला .यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलातर्फे अखेरची मानवंदना देण्यात आली.

चिमूर तालुक्यातील पांढरवाणी येथील वैभव दशरथ वाघमारे वय ३० वर्ष हा केंद्रीय राखीव पोलीस दलात सन 2013 मध्ये भर्ती झाले होते .पुलवामा येथे कर्तव्यावर असलेला वैभव हा घरघुती कामानीमीत्य आठ दीवसापुर्वी पांढरवाणीला आला होता. 15 मे ला सकाळी अचानक उलट्या करू लागले.#khabarkatta chandrapur 

या दरम्यान त्याला ह्रदयवीकाराचा तीव्र झटका आला उपचाराकरीता त्याना उपजील्हा रूग्णालय चिमूर येथे नेण्यात आले होते पण डॉक्टरांनी म्रुत घोषीत केले.

वैभवचा लहान भाउ सुध्दा वीशाल वाघमारे सुध्दा सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहे .केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी वैभवचा म्रुतदेह त्यांच्या ताफ्यासह पांढरवाणी येथे आणला .आणी शासकीय इतमामात वैभवला अखेरची मानवंदना देउन त्यांचा अंतीम संस्कार केला.#khabarkatta chandrapur


Pages