हळदा रेती घाटावर रपटा बनवण्यास अवैध मुरूम उत्खनन - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



हळदा रेती घाटावर रपटा बनवण्यास अवैध मुरूम उत्खनन

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा गाव व परिसर नैसर्गिक वनसंपदेने नटलेले आहे. सोबतच गावा जवळच वैनगंगा नदीचे उच्च व चांगल्या दर्जाची वाळू उपलब्ध आहे. त्यामुळे हळदा येथे वैनगंगा नदीपात्रात रेती घाट अस्तित्वात असून शासनाकडून सदर घाटाचे लिलाव केले आहे.#khabarkatta chandrapur

सदर वाळू घाटाच्या कंत्रादारांकडून वाळू उत्खनन करण्यासाठी रपटा बनविण्याचे काम सुरू आहे.

रपटा बनविण्याच्या कामासाठी वीना वाहतूक परवाना, आधुनिक तंत्राच्या सहाय्याने जेसीबी द्वारा अवैध मुरूम उत्खनन करण्यात येत आहे.

सदर कामासाठी पंधरा ते वीस ट्रॅक्टरने मुरुम वाहतूक सुरू आहेत. विना वाहतूक परवाना अवैध मुरमाचे उत्खनन व वाहतूक सुरू असून महसूल विभागाचे अधिकारी धृतराष्ट्र बनल्याचे दिसून येत आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे. रेती घाट कंत्राटदार व महसूल विभाग यांच्यात असलेले आर्थिक मधुर संबंधामुळेच ही अवैध मुरूमाची तस्करी खुलेआम सुरू असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे.#khabarkatta chandrapur

पिपरबोडी माम तलावातून खुलेआम तस्करी

ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक गावे नैसर्गिक वनसंपदेने नटलेले आहे. तालुक्यात येत असलेल्या हळदा गावातील पिपरबोडी तलावातून मुरूमाच्या अवैध उत्खनन व चोरीला उत आला आहे. सदर मुरुमाची पिपरबोडी माम तलावातून खुलेआम तस्करी केली जात आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल पाण्यात बुडत आहे. परंतु महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे या माफियांचा हिम्मत वाढतच चालली आहे. त्यामुळे आता ठोस कारवाईचीच गरज आहे.#khabarkatta chandrapur

एम.जे. कुडावले हे अवैध तस्करीत लिप्त

मुरूमाचे अवैध उत्खनन थांबवून अवैध वाहतूक तत्काळ बंद करण्यात यावी, उत्खनन होण्याऱ्या स्थळांची पाहणी करण्यात यावी व चौकशी करुन शासकीय नियमानुसार दंडात्मक करावी, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. याविषयी हळदा गावाचे तलाठी एम.जे. कुडावले यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने भ्रमणध्वनी द्वारे वार्तालाप केला असता याबाबत कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले, विना वाहतूक परवाना मुरमाची होत असलेली अवैध तस्करी याच्याविषयी कारवाई करणार का असे विचारले असता, करवाई करणार असं सांगितले, परंतु वृत्त लिहेस्तोव अद्यापही कारवाई करण्यात आली नसुन तलाठी एम.जे. कुडावले हे अवैध तस्करीत लिप्त असल्यानेच करवाई झाली नसल्याची शंका उपस्थित होत आहे.

Pages