वाघाच्‍या हल्‍ल्‍यात मृत झालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना 5 लाख रूपयांची तात्‍काळ मदत...#5 lakhs to the family of a person who died in a tiger attack - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



वाघाच्‍या हल्‍ल्‍यात मृत झालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना 5 लाख रूपयांची तात्‍काळ मदत...#5 lakhs to the family of a person who died in a tiger attack

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

चंद्रपूरच्‍या इंदिरानगर येथील रहिवासी पुरूषोत्‍तम बोपचे (40 वर्ष) हे फुले वेचण्‍यासाठी वनामध्‍ये गेले असता वाघाने त्‍यांच्‍यावर जबरी हमला केला व त्‍यात त्‍यांचा जागीच मृत्‍यु झाला.#khabarkatta chandrapur 

या दुर्देवी घटनेनंतर महाराष्‍ट्राचे वने, सांस्‍कृतिक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोपचे यांच्‍या परिवाराला शासन नियमानुसार मदत करण्‍याचे निर्देश दिले. त्‍यानुसार वनविभागाने बोपचे यांच्‍या कुटूंबास 5 लाख रूपयांचा धनादेश दिनांक 5 मे 2023 रोजी ना. मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते प्रदान केला.#khabarkatta chandrapur

यावेळी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. कारेकर, माजी उपमहापौर राहूल पावडे, माजी नगरसेविका चंद्रकला सोयाम, भाजपाचे मंडल अध्‍यक्ष दिनकर सोमलकर, डॉ. गिरीधर येडे, मनोज पोतराजे, पप्‍पु बोपचे, प्रलय सरकार, आशिष ताजने व त्‍या प्रभागातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. यापुढील मदतीची रक्‍कम या कुटूंबाला लवकरात लवकर देण्‍याचे निर्देश ना. मुनगंटीवार यांनी यावेळी अधिका-यांना दिले.#khabarkatta chandrapur

Pages