खबरकट्टा/चंद्रपूर:
शेताजवळील मंदिरात झोपलेल्या दोन शेतकऱ्यांची हत्या करून मंदिराची दानपेटी लुटणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.आरोपी चंद्रपूर परीसरातील श्याम नगर बंगाली कॅम्प येथील रहिवासी आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता आहे. भद्रावती तालुक्यातील मांगली शेतशिवार येथे 22 मार्च रोजी मधुकर खुजे (70) आणि बाबूराव खारकर (60) यांची हत्या झाली होती.#khabarkatta chandrapur
मांगली गावापासून काही अंतरावर जगन्नाथ बाबाचे मंदिर आहे. या मंदिराला लागून दोघांची शेतं आहेत. त्यामुळे ते रोज शेत पहारा करायला यायचे आणि मंदिरात झोपायचे. दरम्यान, 22 मार्चच्या रात्री अज्ञात दरोडेखोरांनी या दोन शेतकऱ्यांवर हल्ला करून त्यांना जागीच ठार केले आणि मंदिरातील दानपेटी लंपास केली. मंदिरापासून काही अंतरावर ही दानपेटी तुटलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी तपास सुरू केला. यादरम्यान पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपींपर्यंत पोहोचले.
आरोपींनी रात्री या मंदिर परिसरातून फोन केल्याचे तपासात समोर आले आहे. त्याआधारे आरोपीचा शोध घेतला असता मूळ ठिकाणी असलेल्या दारूच्या दुकानातही आरोपींनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलीस त्याच्या मागावर असतानाच भंडारा जिल्ह्यातील लाखनी परिसरात आरोपी न्यायालयासमोर सापडला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून आरोपीला ताब्यात घेऊन चंद्रपूरला आणण्यात आले आहे.#khabarkatta chandrapur
