खबरकट्टा/चंद्रपूर:
मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतील सरणावर ठेवला असता अचानक मधमाश्यांनी सहभागी नागरिकांवर हल्ला चढविला.#khabarkatta chandrapur
यात दोनजण गंभीर जखमी तर 42 नागरिक किरकोळ जखमी झाल्याची घटना सिंदेवाही शहरात घडली. जखमींना तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मधमाश्यांनी हल्ला केल्याची ही दुसरी मोठी घटना आहे.
सिंदेवाही शहरातील महाकाली नगरी परिसरात राहणाऱ्या राजू मार्तंडवार यांचे निधन झाले. स्मशानभूमीत सरण रचले गेले व विधी सुरू झाले होते. त्यानंतर पार्थिवाला अग्नी द्यायचा बाकी असताना मधमाशांनी हल्ला केला. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नातेवाईक आणि इतर नागरिकांना पळता भुई थोडी झाली. यामध्ये महिला आणि लहान मुलं यांचीही पळापळ झाली.#khabarkatta chandrapur

