खबरकट्टा/चंद्रपूर:
नागपूर: पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेने दोन तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दोघांनीही तिच्यासाठी मोठमोठ्या भेटवस्तू, हॉटेलमध्ये खर्च आणि महागड्या कपड्यांपासून ते भ्रमणध्वनीपर्यंत खर्च केला. शेवटी ती पहिल्या प्रियकराच्या बाहुपाशात दुसऱ्या प्रियकराला दिसली. त्यामुळे दोघांमध्ये तुफान हाणामारी झाली. एकाने दुसऱ्यावर चाकू हल्ला करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी कपिलनगर पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. बजरंगी (28, रा. म्हाडा कॉलनी) असे जखमी युवकाचे नाव आहे.#khabarkatta chandrapur
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय महिला मोनाली (काल्पनिक नाव) ही दोन मुलींसह कपीलनगरात राहते. तिला ऐशोआरामत जगायची सवय आहे. तसेच तिला युवकांसोबत मैत्री करण्याची सवय आहे. तिच्या स्वभावामुळे पतीशी तिचा वाद होत होता. त्यामुळे तिने पतीला सोडले आणि मुलींसह वेगळी राहायला लागली. तिने वस्तीत राहणारा अनिल याच्याशी मैत्री केली. त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याला वारंवार घरी बोलावून त्याच्याशी प्रेमसंबंध ठेवले. अनिल तिच्या प्रेमात आकंठ बुडाला. नेहमी तिच्या घरी जायला लागला. मोनालीने त्याला लग्नाचे आमिष दाखवले. त्यामुळे तो तिच्यावर भाळला. अनिलने मोनालीला महागडे कपडे, भेटवस्तू आणि हॉटेलमध्ये नेण्यास सुरुवात केली. तिच्यावर तो खर्च करायला लागला. प्रेयसीचे खूप प्रेम असल्याचे त्याला वाटू लागले.#khabarkatta chandrapur
यादरम्यान मोनालीचा जीव ऑटोचालक असलेला बजरंगी याच्यावर जडला. त्याला तिने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तो दिवसभर ऑटोने कमाई करून मोनालीवर उडवायला लागला. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. यादरम्यान, अनिलशी तिचा दुरावा झाला. अनिलचे ती फोन उचलत नव्हती. त्याला कोणताही बहाणा सांगून टाळाटाळ करायला लागली. त्यामुळे त्याने तिचा पाठलाग केला. ती बजरंगीसोबत फिरताना दिसली. त्यामुळे त्याने मोनालीला वारंवार विचारणा केली. तिने फक्त मित्र असल्याचे सांगून वेळ मारून नेली. शनिवारी रात्री दहा वाजता मोनाली आणि बजरंगी अंधारात एका ठिकाणी गप्पा करीत बसले होते. तेवढ्यात तेथे अनिल आला. त्याने दोघांनाही रंगेहात पकडले. त्याने बजरंगीवर चाकूने हल्ला करीत जीवे मारण्याच प्रयत्न केला. बजरंगीला रक्ताच्या थारोळ्यात बघून मोनाली पळून गेली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.#khabarkatta chandrapur

