खबरकट्टा/चंद्रपूर:
पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण यांचे आदेशान्वये अवैध चंदयाची वाहतुक करणारे वाहनांवर कार्यवाही करणेबाबत जिल्हा वाहतुक शाखेचे पथक हे कन्हान उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना भंडारा नागपूर रोडनी 05 मे 2023 सकाळी 05.00 वा. दरम्यान जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस पथक पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली. की, काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबून कन्तलीकरीता वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन जिल्हा वाहतुक शाखेच्या पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून नाकाबंदी करून पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. एम. एच-36 / एए-3201 क्रमांकाच्या वाहनाला थांबवून तपासले असता सदर वाहनात आरोपी क. 1) रोहीत रमेश गणणे, वय 23 वर्ष व त्याचा साथीदार नामे 2) श्रीकांत तुळशीराम नगरकर, वय 25 वर्ष, दोन्ही रा. लाखनी जिल्हा भंडारा यांच्या ताब्यातुन 13 नग बैलगोवंश) जनावरे किमती अंदाजे 1,22,000/- रु. तसेच पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप क्र. एम. एव-33/ जि.- 2020 या क्रमांकाव्या देखील वाहनाला थांबवून तपासले असता सदर वाहनात आरोपी क्र. 1) अनिल अरुण ठवकर, वय 27 वर्ष, 2) निलेश उर्फ आकाश हरीश हुमणे, वय 27 वर्ष, दोन्ही रा. नांदेरा जिल्हा भंडारा यांच्या ताब्यातून 08 बैल (गोवंश) जनावरे किमती अंदाजे 64,000/- असे एकुण 21 बैल (गोवंश) जनावरे एकुण किमती अंदाजे 186000/- रु जनावरे निर्दयतेने वाहतुक करताना मिळुन आले. आरोपीतांकडुन वाहनासह असा एकुण किमती 1986000 /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.#khabarkatta chandrapur
सदर प्रकरणी सरकार तर्फे फिर्यादी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र मस्कर, जिरा वाहतुक शाखा नागपूर ग्रामीण यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. मौदा येथे वरील आरोपीविरुध्द कलम 11 (1) (ड) प्राणि निर्दयतेने वागणुक प्रतिबंधक कायदा 1960. सहकलम 5(1) (2 9 महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1915, सहकलम 119 पोलीस अधि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यातील सर्व आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन मौदा करीत आहे.
सदरची कारवाई ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात जिल्हा वाहतुक शाखा नागपूर ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक विजय माहुलकर, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र मस्कर, सहायक फौजदार सुधीर यादव, पोलीस नायक प्रणय बनाफर, पोलीस शिपाई कार्तिक पुरी जिल्हा वाहतुक शाखा नागपुर ग्रामीण बानी पार पाडली.#khabarkatta chandrapur
