खबरकट्टा/चंद्रपूर:
चंद्रपूर अतिक्रमित वनजमिनीवर रोपवन न करण्याच्या कामासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महिला वनरक्षकासह तिच्या पतीला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली आहे. सावली तालुक्यातील उपरी बिटातील वनरक्षक शारदा कुळमेथे व तिचे पती संजय अंताराम आतला अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत.#khabarkatta chandrapur
तक्रारदाराच्या वडिलाने वनजमिनीवर अतिक्रमण केले होते.त्या वनजमिनीवर वनविभागाकडून रोपवन न करण्याच्या कामासाठी वनरक्षक शारदा कुळमेथे यांनी तक्रारदारास दहा हजार रुपयांची लाच मागितली. तळजोडीअंती पाच हजार रुपये देण्याचे ठरले. वनरक्षकांनी आपल्या पतीकडे लाच देण्याचे अर्जदारास सांगितले. मात्र, त्यांना आहे.#khabarkatta chandrapur
लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी यासंदर्भात चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिसांनी सापळा रचून वनरक्षकाच्या पतीला लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अविनाश भामरे, पोलिस निरीक्षक शिल्पा भरडे यांच्यासह नरेश नन्नावरे, रवी ढंगळे, वैभव गाडगे, पुष्पा काथोडे, सतीश सिडाम यांच्यासह चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

