प्रेमात अडसर ठरत असलेल्या प्रेयसीच्या मुलाचा प्रियकराने आवळला गळा...#The lover's son's throat was strangled by the lover's son who was getting in the way of love - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



प्रेमात अडसर ठरत असलेल्या प्रेयसीच्या मुलाचा प्रियकराने आवळला गळा...#The lover's son's throat was strangled by the lover's son who was getting in the way of love

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

नागपूर: प्रेमात अडसर ठरत असलेल्या प्रेयसीच्या मुलाचा प्रियकराने गळा आवळून खून केला. अनैतिक संबंधातून हत्याकांड घडल्याची घटना नरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. शुभम असे मृत मुलाचे नाव आहे. तर प्रवीण हिरोडकर असे आरोपीचे नाव आहे.#khabarkatta chandrapur

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम हा विधवा आईसह गावात राहत होता. त्याची आई शेतात मजुरीला जायची तर शुभम ही शिक्षण घेत होता. शुभमच्या वडिलाचे निधन झालेले आहे. आरोपी प्रवीण हा शेतकरी असून तो अविवाहित आहे. त्याच्या शेतात ती महिला कामाला जात होती. यादरम्यान प्रवीणने त्या महिलेशी संबंध वाढवले. तिच्याशी मैत्री केली आणि तिला जाळ्यात ओढले. तिला मदत करण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी सलगी करीत होती. शेवटी प्रवीणने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.#khabarkatta chandrapur

त्यानंतर तो वारंवार तिला शेतमजूर म्हणून कामाला सांगून शेतात नेऊन तिच्याशी संबंध ठेवत होता. काही दिवसांतच महिलेचे आणि प्रवीणच्या प्रेमसंबंधाची चर्चा गावात सुरू झाली. शुभमच्या कानावर चर्चा आल्यानंतर त्याने आईची समजूत घातली. मात्र, आईने फक्त मैत्री असून शारीरिक संबंधाबाबतच्या चर्चेबाबत नकार दिला. एक दिवस शुभम घरी नसताना प्रवीण घरी आला. दोघेही घरात असतानाच शुभम घरी आला. त्यावेळी शुभमने प्रवीणला शिवीगाळ केली आणि आईलाही शिवीगाळ करीत मारहाण केली. आईचे प्रेमसंबंध असल्याची खात्री झाल्यामुळे तो वारंवार तिला प्रवीणशी संबंध तोडण्याची भाषा करीत होता. आईचा प्रियकर प्रवीणने शुभमला एकदा दमदाटी करीत प्रेमसंबंधात अडसर न ठरण्याची धमकी दिली होती.#khabarkatta chandrapur

गुरुवारी शुभमने आईला मारहाण करीत प्रवीणशी अनैतिक संबंधाला विरोध केला. ती रडत रडत घराबाहेर पडली. त्याचवेळी प्रवीण तिच्या घरी आला. त्याने शुभमची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकत नसल्याचे बघून त्याने शुभमचा गळा आवळून खून केला. गावात दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली. त्यामुळे नरखेड पोलिसांनी या घटनेचा छडा लावत आरोपी प्रवीणला अटक केली.#khabarkatta chandrapur

Pages