मोकाट श्वान पिसाळले! पाच बालकांवर केला हल्ला...#Free dog crushed! Five children were attacked - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



मोकाट श्वान पिसाळले! पाच बालकांवर केला हल्ला...#Free dog crushed! Five children were attacked

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

वर्धा: ग्रामीण भागातही मोकाट श्वानांचा हैदोस लोकांच्या जीवावर बेतत असल्याचे करंजी पाठोपाठ दुसरे उदाहरण पुढे आले आहे.#khabarkatta chandrapur

सेलू तालुक्यातील रेहकी गावात मुलांना या श्वानांनी भयभीत केले. घरापुढे खेळणाऱ्या एका चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. तिचा चेहरा जखमी करीत श्वानाने बाजूलाच असलेल्या अंशू मानके या सात वर्षीय बालकाच्या हाताचा लचका तोडला. अनुष्का धबरडे हिच्या दंडाला चावा घेत जखमी केले. तर रोशन दिलीप सरतकर याला चावा घेतला. लगेच सिकंदर गोडघाते याच्या पायाला चावल्याने बालक चांगलाच घाबरला. परत एका बालकावर हल्ला करीत असताना लोकांनी आरडाओरड केली. श्वान पळाले, मात्र बालक पडून जखमी झाले.#khabarkatta chandrapur

गावातील लोकांनी शेवटी एकत्र येत पिसाळलेल्या श्वानाला ठार केले. जखमी बालकांवर सेलूच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. भटक्या श्वानांची ही टोळी गावकऱ्यांसाठी भीतीदायक ठरत आहे.

Pages