वर्धा येथील मा. जिल्हा व सत्र न्यायाधिश, वर्धा श्री. एन. बी. शिंदे यांचे न्यायालयाने आरोपी आकाश राज पटेल रा. सर्कस ग्राउंड, वर्धा याने तरुण मुलास चाकुने भोसकून जिवाने मारहाण केल्याप्रकरणी भादवि कलम 307 अन्वये जन्मठेप आणि रु. 50000/- दंड व दंड न भरल्यास 2 वर्षे समम कारावास तसेच कलम 324 अन्वये 3 वर्षे सभम कारावास व 10000/- दंड व दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच पल केलेल्या दंडापैकी रु. 40000/- सुशित दिलिप बेलकुंडे यांस आणि रु. 5000/- फिर्यादी दिलिप देवरावजी बेलकुंडे याला नूकसान भरपाई म्हणुन देण्याचा आदेश केला आहे त्याच प्रमाणे सुशील दिलीप बेलकुंडे यास जिल्हा विधी न्याय प्राधिकरण यति कडुन नुकसान भरपाई देण्याची शिफारसकेलेलीआहे.#khabarkatta chandrapur
घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी दिलिप देवरावजी बेलकुंडे रा. सिंदी रेल्वे जि. वर्धा यांचा मोठा गुलगा प्रणय दिलिप बेलकुंडे वय 25 वर्षे याचा आरोपी आकाश राजू पटेल रा. सर्कस ग्राउंड, व याने घटनेच्या दोन वर्षा अगोदर खुन केलेला होता. त्याबाबतची तक्रार केल्याप्रकरणी आरोपी आकाश पटेल या फिर्यादी व त्यांचे कुटुंबाचा राग करीत होता, त्याच जुन्या वादाच्या कारणांवरुन रात्री अंदाजे 8.30 वाजता सुमारास फिर्यादी व त्यात सर्व कुटुंब हजर असताना मधुर राजूरकर व त्याचा मित्र असे दोघे फिर्यादीच्या घरी आले व फिर्यादीचा गुलमा सुशिल दिलिप बेलकुंडे यांस घराबाहेर बोलावून त्याचेसोबत बोलचाल करुन ते परत गेले. घटनेच्या दिवशी राजेश दिनांक 13/03/2017 रोजी फिर्यादी दिलिप देवरावजी बेलकुंडे व त्यांचे सर्व कुटुंबातील मुलगा सुशिल सोबत बाहेर बसलेले असतांना रात्री 9.00 वाजता आरोपी आकाश राजू पटेल, मयूर राजूरकर असे दोघे मोटर सायकलने फिर्यादीच्या घरासमोर येऊन सुशिल दिलिप बेलकुंडे यांस जवळ बोलविले आणि आरोपी आकाशने त्यानी मोटर सायकल सुशिलच्या अंगावर ढकलली ती मोटर सायकल सुशिल पकडण्यास गेला असता आरोपी आकाशने आपल्या खिशातून चाकू काढून सुशिलच्या पोटावर चाकूने सपासप वार करून जखमी केले व आकाशचा मित्र मयूरने सुशिल यांस लाथाबुक्कयाने मारहाण केली. फिर्यादी दिलिप देवरावजी बेलकुंडे सुशिल यांस वाचविण्यास गेले असता आकाशने फिर्यादीच्या मनगटावर चाकूने वार करून जखमी केले. त्याचवेळेस शेजारी राहणारे अरुण वाकेकर आणि त्यांचा मुलगा विकेश वाचविण्यासाठी गेले असता आरोपी आकाश व मयूर राजूस्कर घटनास्थळावरुन पळून गेले.#khabarkatta chandrapur
लगेच जखमी सुशिल यांस मोटार सायकलवर सरकारी दवाखाना येथे उपचारासाठी घेउन गेले फिर्यादीच्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन रामनगर येथे आरोपीविरुद्ध कलम 307, 326 भा. दं. वि. या गुन्हा नोंद करून तपासात घेतला. सदर प्रकरणाचा तपास श्री. व्हि आर. मगर, पोलीस निरिक्षक, पो. स्टे रामनगर जि वर्धा यांनी केला तपासा दरम्यान आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने अप क 41/2017नुसार दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले.#khabarkatta chandrapur
सदर प्रकणात सरकार पक्षाच्या बाजुने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, श्रीमती प्रमिला एस. तिबुडे यांनी कामकाज पाहीले व यशस्वि युक्तिवाद केला. तसेच पैरवी अधिकारी सहायक पोलीस उपनिरिक्षक राम कापसे, पोलीस स्टेशन रामनगर जि वर्धा यांनी साक्षीदारांना न्यायालयात हजर करून मोलाची कामगिरी बजावली शासना तर्फे एकूण 16 साक्षदार तपासण्यात आले व सरकार पक्षाला मदत केली. सरकारी पक्षाता युक्तीवाद ग्राहय धरून मा. जिल्हा व सत्र न्यायाधिश, वर्धा श्री. एन. बी. शिंदे यांचे न्यायालयाने यांनी आरोपीस दि. 10/04/2023 भादवि ये कलम 307 अन्वये आजन्म कारावास आणि रु. 50000/- दंड व दंड न भरल्यास 2 वर्षे रामम कारावास तसेच कलम 324 अन्वये 3 वर्षे सश्रम कारावास व 10000/- दंड व दंड न भरल्यास 6 महिने सकारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.