वरोरा ते भद्रावती महामार्गाने गांजा तस्करी होत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली त्या आधारे कोंढा फाट्याजवळ एक महिला सह दोन आरोपींना अटक करण्यात आली.#khabarkatta chandrapur
अजित खा पठाण वय 50, रुबीना बानो अब्दुल हबीब शेख वय 38 वर्ष राहणार दोन्ही वरोरा हे ऑटो क्रमांक एम एच 34 डी 8056 नी गांजाची विक्री करण्यासाठी भद्रावती परिसरात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्या आधारे ठाणेदार बिपिन इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल किटे, शशांक बदामवर, मोनाली गारघाटे, संगीता यादव, रोहित चीटगिरे, योगेश घोटोळे यांनी कोंढा परिसरात सापडा रचून चार किलो गांजा किंमत 22 हजार, ऑटो 1 लाख 50 हजार असा मुद्देमाल जप्त केला. भद्रावती परिसरात गांजा विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने भद्रावती पोलिसांनी आठवडयात ही मोठी दुसरी कारवाई केली असुन पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.#khabarkatta chandrapur