वर्धा - दिल्ली येथील आयपीएल क्रिकेट सुरु असून यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जात असल्याची माहिती वर्ध्यातील क्राईम इंटेलिजन्स पथक व सायबर सेलला मिळाली. या माहितीच्या आधारे वर्धा आणि टाकळघाट या ठिकाणी धाड टाकून सहा जुगा-यांची दांडी उडविली. त्यांच्याकडून दोन कारसह मोबाईल आणि इतर वस्तू असा एकूण 49 लाख 22 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.#khabarkatta chandrapur
गणेश राठी रा. भामटीपुरा, सलमान रज्जाक मेमन (27) रा. शास्त्री चौक, जितेंद्र रंजित तिवारी (34) रा. रामनगर सिंदीनाका, माधव इश्वरदास नानवाणी (34) रा. दयालनगर, मुकेश अनिल मिश्रा (33) रा. परदेशीपुरा, रिकेश मनोज तिवारी (27) रा. वैद्य ले आऊट असे अटक करणाया आलेल्या आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. शहरातील भामटीपुरा परिसरातील गणेश राठी हा व्यक्ती अॅन्ड्राईड मोबाईलवर आयपीएल टी - 20-20या दिल्ली विरुद्ध मुंबईच्या क्रिकेट मॅचवर सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून गणेश राठी याला ताब्यात घेतले.#khabarkatta chandrapur
त्याच्या मोबाईलचा संदेश बॉक्स तपासला असता मोबाईल क्रमांक 7387188397 वरुन दिल्ली विरुध्द मुंबई या मॅचच्या 10 ओव्हरमध्ये 70 रन होतील असे 2 हजार रुपयांचा जुगार लावला होता. हा मोबाईल क्रमांक सलमान रज्जाक मेमन याचा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तो मोबाईल क्रमांक बुट्टीबोरी लगतच्या टाकळघाट येथे असल्याने तांत्रिक माहितीवरुन पुढे आले. त्यामुळे पोलिस पथक आणि पंच टाकळघाटमध्ये पोहचले. तेथील लिंक बिल्डींगच्या तिस°या माळ्यावरील फ्लॅट क्रमांक 10 मध्ये धडक दिली. तेथे पाचही आरोपी सट्टा घेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या पाचही आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून 40 मोबाईल, 3 लॅपटॉप, 4 माईक, 2 मोबाईल रिसिव्हर आणि दोन कार, असा एकूण 49 लाख 22 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.#khabarkatta chandrapur
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांच्या मार्गदर्शनात क्राईम इंटेलिजन्स पथक प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, विनीत घागे याच्यासह निलेश कट्टोजवार, रोशन निंबोलकर, दिनेश बोथकर,विशाल मडावी, अनुप कावळे, अक्षय राऊत, सागर भोसले, अंकित जिभे, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, मंगेश आदे, गोविंद मुंडे, धिरज राठोड, राकेश इतवारे, पवन देशमुख, अभिषेक नाईक, हर्षल सोनटक्के, प्रफुल वानखेडे यांनी केली.
