वरोरा:तुरुंगात असलेल्या एका आरोपीच्या नावाने शहरात देवा ग्रुप नावाची संघटना स्थापन करून जयंतीसाठी पोस्टरबाजी करत व्हॉट्सअॅपवरून मदत मागणाऱ्या तिघांविरुद्ध पोलिसांनी सोमवारी खंडणीचा गुन्हा दाखल केला. गौरव स्थापना केली. वाळके, आर्यन हिवरे व यश नागपुरे अशी आरोपींची नावे आहेत.#khabar katta chandrapur
शहरातील देवा भय्याजी नौकरकर रा. मित्र चौक हा खुन्याच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे. गौरव वाळके, आर्यन हिवरे व यश नागपुरे या तिघांनी या गुन्हेगाराच्या नावाने देवा ग्रुपची स्थापना केली.#khabar katta chandrapur
शिवाय, देवा नौकरकरसोबत स्वतःचे छायाचित्र असलेले पोस्टर्स शहरात लावले. अनधिकृत पावती बुक छापून 'देवा भाऊ जेलमधून लवकरच परत येईल. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम घेऊ. त्यासाठी वर्गणी द्या असा संदेश व्हॉट्सअॅपवरून व्हायरल केला होता. याविरुद्ध तक्रार प्राप्त होताच गौरव वाळके, आर्यन हिवरे, यश नागपुरे या तिघांविरुद्ध भादंवि 384, 385 अन्वये खंडणीचा गुन्हा दाखल केला.#khabar katta chandrapur

