चंद्रपुरातील धक्कादायक घटना: त्याने प्रेयसी वर टाकले पेट्रोल आणि...#Shocking incident in Chandrapur: He poured petrol on his girlfriend - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चंद्रपुरातील धक्कादायक घटना: त्याने प्रेयसी वर टाकले पेट्रोल आणि...#Shocking incident in Chandrapur: He poured petrol on his girlfriend

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

मूल :- प्रेयसीवर पेट्रोल टाकून प्रियकराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी मूल मध्ये घडली. या घटनेने मूल मध्ये खळबळ उडाली आहे. गळफास लावून आत्महत्या करणा-या मृतकाचे नाव बंडू उर्फ रामचंद्र निमगडे वय (45) रा. मूल वार्ड क्रं.11 असे आहे. घरा शेजारी राहणा-या एका विवाहीत असलेल्या शबाना नामक मुलीशी मृतकाचे ब-याच वर्षापासून प्रेमसंबध होते.#khabarkatta chandrapur

याच कारणामुळे मृतकाच्या घरी नवरा बायको मध्ये नेहमी वाद भांडणे व्हायची. दोघांनाही एक एक मुलगा असून यांच्या प्रेमसंबधाचीं नेहमीच चर्चा व्हायची. घटनेच्या दिवशी सोमवारी दुपारी तणावामध्ये असताना बंडू निमगडे यांने एका बाटलीमध्ये पेट्रोल आणून प्रेमसंबध असलेल्या शबाना नामक प्रेयसीच्या घरी जावून तिच्या अंगावर पेट्रोल टाकले. व तिला जिवानीशी मारण्याचा प्रयत्न केला.#khabarkatta chandrapur

त्याच तणावामध्ये असताना निमगडे यांने वार्ड क्र.11 मधील राहत्या घरी येवून स्वतः गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दुपारी तीन वाजताच्या दरम्यान घडल्या. पेट्रोल टाकून जखमी झालेल्या शबाना नामक महिलेला मूल मध्ये प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे पुढील उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.#khabarkatta chandrapur

दरम्यान, घटनास्थळी जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी भेट दिली. जिवानिशी मारण्याचा प्रयत्न केल्याने मृतक बंडू निमगडे यांच्या विरुदध 307 चा गुन्हा दाखल झाला असून आत्महत्या प्रकरणी मर्ग दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास प्रभारी ठाणेदार बन्सोड करीत आहेत.


Pages