सुशिक्षित तरुणीच बनली मारेकरी : बल्लारपूरमध्ये झोपेतच गळा आवळून केला खून...#Educated young woman turned killer: strangled in her sleep in Ballarpur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



सुशिक्षित तरुणीच बनली मारेकरी : बल्लारपूरमध्ये झोपेतच गळा आवळून केला खून...#Educated young woman turned killer: strangled in her sleep in Ballarpur

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

बल्लारपूर. कौटुंबिक कलहातून रागाच्या भरामध्ये एका उच्चशिक्षित तरुणीने पित्यासमान व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. ही घटना शनिवार (ता. 22 ) रोजी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास घडली. मृतककाचे नाव विशाल काशिनाथ दासरवार (वय46) असे आहे. ही तरुणी दादाभाई नौरोजी वार्ड येथील असून ती मृतकाची नातलग आहे. घटनेनंतर तरुणीने स्वतः पोलीस ठाण्यात येऊन हत्त्या केल्याची कबुली दिली. मृतक विशाल काशिनाथ दासरवार हे दादाभाई नौरोजी वार्ड येथील रहिवाशी आहे. त्याला दारूचे खुप व्यसन होते. त्यामुळे कुटुंबात नेहमी वाद होत होते. हत्या करणारी तरुणा ही मृतक व्यक्तीच्या साळीची मुलगी असून दोघेही एकाच घरात राहत होते.

ती उच्चशिक्षित असून तीचे एम.बी.ए पर्यंत शिक्षण झाले आहे. कुटुंबात नेहमीच वाद होत होते. या वादाला कंटाळून रागाच्या भरामध्ये हा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर त्या तरुणीने स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन हत्येची कबुली दिली. या हत्याकांडात कुटुंबीयांसह अन्य व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय येत असल्याने हात्याकांडाचा पुढील तपास बल्लारपूर पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश हत्तीगोटे करीत आहे.


Pages