शिवसेना वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरीकर यांच्यावर प्राणघातक हल्ला...#Shiv Sena Varora taluka chief Dutta Borikar assaulted - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



शिवसेना वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरीकर यांच्यावर प्राणघातक हल्ला...#Shiv Sena Varora taluka chief Dutta Borikar assaulted

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरीकर यांच्यावर अनोळखी इसमानी काल रात्री 11. 30 ते 12.00 च्या दरम्यान वरोरा -भद्रावती विधानसभा मध्यवती कार्यालय वरोरा नागपुर नाका चौक येथुन कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रचार आटपवुन घरी जात असताना देशपांडे पेट्रोल पंपासमोर प्राणघातक हल्ला करण्यात आला असुन ही विरोधकांची खेळी असल्याचे बोलल्या जात आहे.#khabarkatta chandrapur

कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचाराची रनधुमाळी सुरु असताना व प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना या निवडणूकीतील उमेदवारावर जिवघेना हल्ला होणे म्हणजे विरोधकांची राजकीय नीतिमत्ता किती खालच्या पातळीवर गेली याचा अंदाज येत आहे,

दत्ता बोरीकर यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती कारण्यात आले आहे. दरम्यान शिवसेना पदाधिकारी आता आक्रमक झाले असून या घटनेचे पडसाद जिल्हाभर उमटणार असल्याने त्यांची पुढील काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.#khabarkattachandrapur

Pages