वीज पडून अख्खे कुटुंबच ठार...#The entire family died due to lightning - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



वीज पडून अख्खे कुटुंबच ठार...#The entire family died due to lightning

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

देसाईगंज:- वडसा-कुरखेडा मार्गावरील दुग्ध डेअरी (तुळशी फाटा) जवळ वीज पडून अख्खे कुटूंबच ठार झाल्याची घटना दि. 24 एप्रिल 2023 ला सायं. 5.00 वाजताच्या सुमारास घडली. भारत लक्ष्मण राजगडे (32) संगीतकार रा. आमगांव ता. देसाईगंज व त्याची पत्नी सौ. अंकिता भारत राजगडे (30) हे दोघेही पती-पत्नी आपल्या दोन्ही लहान मुलांसह गरगळा येथुन लग्न लावून येत असताना मार्गातच हलक्या पावसाची सुरुवात होऊन वीज कडाइने सुरु झाले. वीज कडाडत असल्याने राजगडे यांनी दुग्ध डेअरी जवळ एका झाडाच्या खाली आसरा घेतला असता अचानक वीज अंगावर पडल्याने राजगडे कुटूंबातील चारही जण जागीच मृत्युमुखी पडले. याबाबत दसाईगंज पोलीसांनी घटनास्थळ गाठून चारही जणांचे शव उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे पाठविले पुढील तपास पो.नि. रासकर यांचे मार्गदर्शनात सुरु आहे.


Pages