उद्या चंद्रपूर जिल्ह्यात ऑरेंज तर पुढील चार दिवस येलो अलर्ट जारी...#Orange alert issued in Chandrapur district tomorrow and yellow alert for next four days - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



उद्या चंद्रपूर जिल्ह्यात ऑरेंज तर पुढील चार दिवस येलो अलर्ट जारी...#Orange alert issued in Chandrapur district tomorrow and yellow alert for next four days

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर :

भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात 24 ते 28 एप्रिल 2023 या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व जिल्ह्यातल एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, वादळ वारा (वेग 40-50 कि.मी. / तास) आणि गारा पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. तसेच 25 ते 28 एप्रिल 2023 या दिवसांकरीता यलो अलर्ट व दिनांक 25 एप्रिल 2023 या कालावधीकरीता आँरेज अलर्ट जारी केला आहे.#khabarkatta chandrapur 

या अनुषंगाने नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घ्यावी. पाऊस व गारपिटीचा अंदाज लक्षात घेता रब्बी हंगामातील परिपक्व अवस्थेतील (हरभरा, गहू, मोहरी, जवस इत्यादी.) पिकाची आवश्यक काळजी घ्यावी. वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहावे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व विजा होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. जनावरांना मोकळ्या जागेत चारावयास सोडण्याचे टाळावे. तसेच गोठ्या मधेच चारा व पाण्याची उपलब्धता करून द्यावी.#khabarkatta chandrapur 


जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी व शेतकऱ्यांनी शासनाच्या सूचनांचे पालन करावे. शेतातील पिकांची, जनावरांची आवश्यक काळजी घ्यावी व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने कळविले आहे.


Pages