शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात विदर्भ मराठवाडा, तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यातील भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या शक्तीदायीनी माता महाकांली मंदिराच्या जननी तथा चंद्रपूर शहराच्या जडणघडणीत ज्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे त्या राजमाता राणी हिराई यांच्या जयंती निमित्ताने जन्मोस्तव सोहळा तथा महिला मेळावा आणि विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा सत्कार समारंभ दि. 23 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला.#khabarkatta chandrapur
महिला या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करू शकतात परंतु त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे. व्यासपीठा अभावी त्यांच्या कलागुणांना वाव मिळू शकत नाही. अश्यावेळी महिलांनासाठी कार्यरत असणाऱ्या संघटनांनी पुढाकार घेऊन महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे असे प्रतिपादन या वेळी मान्यवरांनी केले.गोंडवाना मातृशक्ती संघटना जिल्हा चंद्रपूर च्या वतीने जिल्हातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध महिलांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला.#khabarkatta chandrapur
यावेळी गोंडवाना मातृशक्ती संघटनेच्या जिल्हाध्यक्ष अर्चना खंडाते, रामनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक लता वळिवे, जिवती नगरपंचायतीच्या नगरसेविका सतलूबाई जुमनाके, पोंभुर्णा पंचायत समितीच्या माजी सभापती अल्काताई आत्राम, गोंडी धर्मप्रचारिका रंजनाताई उईके, गोंडी धर्मप्रचारिका कल्पना चिकराम, वर्धा येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदनी धावंजेकर, जिवती नगरपंचायतीच्या नगरसेविका लक्ष्मीबाई जुमनाके, गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कन्नाके, संचालक ज्योतीराम गावडे, विजय तोडासे, राजू परचाके, प्रा. प्रकाश वट्टी, संकेत कुळमेथे, पलाश पेंदाम यांच्यासह जिल्ह्यातील महिला भगिनी तथा समाज बांधव उपस्थित होते.#khabarkatta chandrapur
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोंडवाना मातृशक्ती संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष रजनीताई परचाके आणि भावना आलाम यांनी प्रास्ताविक लताताई शेडमाके यांनी तर आभार प्रदर्शन विद्या सोयाम यांनी मानले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोंडवाना मातृशक्ती संघटनेच्या संगीताताई सिडाम, वनिता अलाम, पूजा परचाके, पुष्पा कुळमेथे, मनीषा परचाके, किरण पेंदोर, संगीता पेंदाम, उषा कोडापे, पौर्णिमा गेडाम, सुनीता उईके यांच्या सह जिल्हा आणि तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

