सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव गन्ना येथे अवैध दारू साठा करून चोरटी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करून ठेवलेल्या दारू साठ्यावर सिंदेवाही पोलिसांनी बुधवार सायंकाळी धडक कार्यवाही करीत गोपनिय माहीती वरून कळमगाव गन्ना येथील आरोपीच्या घराची झडती घेतले असता घरातील समोरच्या खोलीत बाजेवर एका खड्ड्याच्या खोक्यात देशी दारू 90नग व नायलॉनच्या थैलीत विदेशी दारू 9नग. असा एकुन 6 हजार 750 रुपये किमतीचा अवैधरित्या दारू साठा मिळुन आल्याने पोलीसांनी जप्त करीत एकावर गुन्हा दाखल केला आहे.#khabarkatta chandrapur
याप्रकरणी सिंदेवाही पोलिस स्टेशन अप. क्र.157/2023 नोंद करीत आरोपी विरुद्ध कलम 65( ई) मदाका नुसार पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही कारवाई सिंदेवाही ठाणेदार यांच्या आदेशान्वये पोलीस हवालदार शंकर राउत यांनी केली आहे. गुन्हातील आरोपीला सूचना पत्रावर सोडण्यात आले असून पुढील तपास संदीप कोवे हे करीत आहेत.
