शहरातील स्वराज नगर शेत शिवारात कोंबडयावर पैशाची बाजी लावून जुगार खेळत असताना भद्रावती पोलिसांनी धाड टाकून सात हजाराच्या मुद्देमालासह पाच आरोपीला अटक केली ही कारवाई शुक्रवारला करण्यात आली.#khabar katta chandrapur
अजय दौलत कौरासे 28 घोट निंबाळा, अविनाश शिवरकर 31 , दीपक मेश्राम 20, बंडू गुच्चे 50, राहणार भद्रावती. अशोक बोढेकर 54 राहणार मांगली असे आरोपीचे नाव आहे स्वराज नगर शेत शिवारात कोंबड्यावर पैशाची बाजी लावून जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली त्या आधारे धाड टाकली असता पाच कोंबडे व डावावर लावलेली रोख रक्कम असा 7 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला यातील पाच आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून बाकी आरोपी घटना स्थळावरून पसार झाले ही कारवाई ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक मुळे, पोलीस शिपाई योगेश पाटोळे यांनी केली#khabarkatta chandrapur

