शुक्रवारच्या सायंकाळी यवतमाळात भरधाव ट्रकने एका बारा वर्षे बालकाला चिरडल्याची घटना घडली. या घटनेत १० वर्षीय बालक जागीच ठार झाला. यामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण पहायला मिळाले.#khabarkatta chandrapur
यवतमाळ ते नागपूर रोडवरील शनी मंदिर चौकात शुक्रवारी सायंकाळी पावणे सहा वाजता ही घटना घडली. आयुष राजेश आत्राम हा बालक सायकलने रस्ता पार करीत होता. याचवेळी यवतमाळकडून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकने बालकाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की सायकलस्वार बालक जागीच ठार झाला. अपघाताच्या घटनेनंतर नागरिकांनी प्रचंड हळहळ व्यक्त केली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अपघातग्रस्त ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला. या ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले.#khabarkatta chandrapur
शहरासह जिल्ह्यातील वाढत्या अपघाताच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रिंगरोड असतांना जड वाहतूक शहरातून होतेच कशी असा प्रश्न यावेळी नागरिकांनी उपस्थितीत केला. ही वाहने सुसाट वेगाने धावतात. यामुळे अपघाताच्या घटनाही घडतात.#khabarkatta chandrapur