चंद्रपूर बल्लारपूर मार्गावरील ए पी जे अब्दुल कलाम बागेच्या मागील भागात तर सैनिक शाळेजवळील रोड लगतच्या झुडपी जंगलात अंदाजे 55 वर्षवयाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळला.सदर इसमाचा उन्हामुळे मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे.#khabarkatta chandrapur
मृतक व्यक्तीने शेंदरी रंगाचा शर्ट, निळ्या रंगाचा नाईट फुल पेन्ट व डोक्यावर पांढया रंगाचा रुमाल बांधलेला असून सदर मृतक सडपातळ बांध्याच्या असून अंदाजित वय 55 वर्षे असेल.
सदर मृतक इसमाचा शोध लागल्यास शहर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधण्याचे चंद्रपूर शहर पोलीस प्रशासनान केले आहे.