ट्रॅव्हल्समध्ये 50 टक्के सवलतीच्या नावाखाली महिलांची दिशाभूल: महिलांकडून 50 टक्क्यांपेक्षा जास्त वसूल करतात प्रवास भाडे...#Misleading women in the name of 50 percent discount in travels: Women are charged more than 50 percent in travel fares - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



ट्रॅव्हल्समध्ये 50 टक्के सवलतीच्या नावाखाली महिलांची दिशाभूल: महिलांकडून 50 टक्क्यांपेक्षा जास्त वसूल करतात प्रवास भाडे...#Misleading women in the name of 50 percent discount in travels: Women are charged more than 50 percent in travel fares

Share This

खबरकट्टा/चंद्रपूर:

मूल : महाराष्ट्र सरकारने नुकतेच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे सर्व महिलांसाठी 50 टक्के सवलतीच्या दरात प्रवास योजना सुरू केली. त्यामुळे महिलांसह कुटुंबातील पुरुषांनीही एसटी बसने सुखकर प्रवास सुरू केला. परिणामी खाजगी ट्रॅव्हल्स पूर्णतः ओस पडल्या होत्या. दरम्यान, चंद्रपूर, गडचिरोली ट्रॅव्हल्स संघटनेच्या माध्यमातून महिलांना ट्रॅव्हल्समध्ये 50 टक्के सवलत देण्याचे वृत प्रकाशित केले. त्यामुळे महिलांनी ट्रॅव्हल्सने प्रवास सुरू केला. मात्र, ट्रॅव्हल्सवाले महिलांकडून 50 टक्क्यांपेक्षा जास्त प्रवास भाडे वसूल करून त्यांची दिशाभूल करीत आहेत.#khabar katta chandrapur 

गुढीपाडव्यापासून ट्रॅव्हल्समध्ये 50 टक्के सवलत देण्याचे वृत प्रकाशित केले. त्यामुळे महिलांनी ट्रॅव्हल्सने प्रवास सुरू केला. मात्र, ट्रॅव्हल्सवाले महिलांकडून 50 टक्क्यांपेक्षा जास्त प्रवास भाडे वसूल करून त्यांची दिशाभूल करीत आहेत.#khabar katta chandrapur 

शासनाने महिलांना प्रवासात 50 टक्के सवलत जाहीर करताच महामंडळाच्या बसमध्ये महिलांची मोठी गर्दी बघायला मिळाली, तर खाजगी ट्रॅव्हल्सकडे महिलांसह पुरुषांनीही पाठ फिरवल्याने खाजगी ट्रॅव्हल्स मालकांचे धाबे दणाणले. काही दिवस 5 ते 10 प्रवासी घेऊन ट्रॅव्हल रस्त्यावर चालताना दिसत होत्या. त्यांना गाडीच्या डिझेलसह ड्रायव्हर, ट्रॅव्हल्समध्ये काम करणाऱ्या मुलांचेही पगार काढणे अशक्य होते. त्यामुळे आहे. नाइलाजास्तव चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स संघटनेच्या वतीने महिलांना 50 टक्के सवलत जाहीर करीत ठिकठिकाणी फलक लावले. मात्र,प्रवास करताना महिलांकडून 50 टक्क्यांपेक्षा जास्त प्रवास भाडे आकारात असल्याने महिला चांगल्याच टक्के सवलत जाहीर करताच ठिकठिकाणी फलक लावले. मात्र, संतापत आहेत.#khabar katta chandrapur 

ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरील चालणाच्या ट्रॅव्हल्समध्ये प्रवासी वाहतूक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून भरगच्च वाहतूक करीत आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. मात्र, यामुळे प्रवास करणाच्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करून प्रवाशांच्या जीवनाशी खेळणाया खाजगी ट्रॅव्हल्स मालकावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केला जात

Pages