बल्लारपूर:- बल्लारपूर येथे एकाची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात खळबळ उडाली आहे.#khabarkatta chandrapur
बल्लारपूर येथील न्यू कॉलनी रोड महाराणा प्रताप वॉर्ड दुर्गा माता मंदीरजवळ शामराव कोडूरवार यांच्या मृत्यूनंतर घराच्या प्रॉपर्टीकरिता नेहमी वाद होत असे. शामरावला मुलगा नसून तीन मुली आहेत. त्यात दुसऱ्या नंबरचा जावई विशाल दासरवार नेहमी सासू सोबत वाद घालायचा. अशातच शनिवारी 22 एप्रिल रोजी पहाटेला विशाल दासरवारची गळा कापून हत्या करण्यात आल्याची बाब उघडकीस आली.#khabarkatta chandrapur
हत्येनंतर बल्लारपूर पोलिसांना याबाबत माहिती मिळाली असता त्यांनी तपासाला गती देत या प्रकरणी MBA करणाऱ्या कुटुंबातील एका युवतीला ताब्यात घेतले असून सदर युवतीने विशाल ची हत्या केल्याचे कबूल केले आहे. आरोपी युवती ही मृतकाची नातेवाईक असून मृतक तिचा नात्याने सख्खा मावसा लागत होता. पोलिसांनी अजून दोघांना ताब्यात घेतले आहे मात्र तपास सुरू असल्याने आरोपींची नावे जाहीर करण्यात आली नाही.

